Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

शेलारांच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री म्हणाले, कान बधीर झाले विरोधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. या गोंधळातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोक प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. परंतु माईकमधून बोलण्यास सुरुवात करूनही त्यांचा आवाज कमी यायला लागल्याने विरोधकांनी इशाऱ्याने मोठ्याने बोला असे सुचविले. त्यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी तुमच्या आवाजाने माझे …

Read More »

विरोधकांचे वय ६ ते १८ असेल तर मोफत चष्मे वाटू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विरोधकांना प्रतित्तुर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आणि चांगल्या पध्दतीने काम करत आहे. मात्र विरोधकांना चांगली कामे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचे वय ६ ते १८ वयोगटातील असेल तर शालेय मुलांना ज्याप्रमाणे मोफत चष्मे वाटले तसे त्यांनाही मोफत चष्मे वाटू अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या …

Read More »

शरद पवारांना त्या पध्दतीने एल्गार आणि भीमा-कोरेगांवचा तपास न्यायचाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबईः विशेष प्रतिनिधी काही वर्षापूर्वी झालेल्या भीमा कोरेगांव येथील हिंसाचाराची आणि पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेचा एकमेकांशी संबध आहे. जेव्हा हिंसाचाराची घटना घडली तेव्हा शरद पवारांनी या हिंसाचाराचा संबध हिंदूत्ववाद्यांशी जोडला. मात्र आता शहरी नक्षलवाद्याचे काही पुरावे समोर आल्याचे दिसल्यानेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविला असल्याचे …

Read More »

महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर भाजपाची तिसरी जागा धोक्यात आणण्यासाठी आघाडीकडून दोन जण उतरणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यसभेवरील राज्यातील सात खासदारांची मुदत संपत आहे. या ७ पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. तर ५ वा उमेदवार महाविकास आघाडीकडून संयुक्तरित्या उभा करण्यात येणार आहे. मात्र भाजपाकडून आतापर्यंत फक्त दोनच जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …

Read More »

नवा उद्योग सुरु करायचंय, या मग स्टार्टअप सप्ताहमध्ये नवउद्योजकांनी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप’ सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरीता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा अधिक माहितीकरिता [email protected] या ईमेलवर अथवा ०२२-३५५४३०९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. …

Read More »

फडणवीसांकडून घरांचा साठा बंद, तर ठाकरे सरकारने केला निम्म्याहून निम्मा प्रिमियम रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पानांही मिळणार प्रिमियममध्ये सूट

मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबईकरांसाठी परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यासाठी विकासकांकडून घरांचा साठा घेण्याच्या निर्णयाला फडणवीस सरकारने फिरविला. त्याऐवजी प्रिमियममध्ये निम्याने कपात करत तोच भरण्यास विकासकांना सांगितले. तर विद्यमान ठाकरे सरकारने या प्रिमियममध्ये निम्म्यापेक्षा निम्म्याने कपात करण्याचा निर्णय घेत हा निर्णय ऑगस्ट २०१९ पूर्वीच्या रखडलेल्या प्रकल्पांनाही लागू करण्याचा निर्णय घेतल्याने …

Read More »

विद्यार्थ्यांचे १६ शुल्क सरकार भरणार बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता 16 इतर शुल्कांचा समावेश केला असून त्याचे अनुदान अनुदानित व विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार असल्याची माहिती बहुजन कल्याण विभागाचे (ओबीसी) मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सन 2005-06 पासूनच्या …

Read More »

मोफत वीज द्यायचीय, पण ४० हजार कोटी कसे जमा करायचे? ऊर्जा विभागासमोर मोठा प्रश्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज मोफत देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत केली. मात्र या मोफत वीजेपोटी वीज महावितरण पर्यायी राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणाऱ्या ४० हजार कोटी रूपयांच्या आर्थिक बोज्याचे वसुली कशी करायची असा प्रश्न ऊर्जा विभागाला पडल्याची माहिती वीज महावितरणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. …

Read More »

नगरविकासच्या मनिषा म्हैसकर यांच्याकडे आता राजशिष्टाचार विभाग ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या महत्वाच्या विभागाचे प्रधान सचिव असलेल्या मनीषा म्हैसकर-पाटणकर यांची आज बदली करण्यात आली असून त्यांची रवानगी आयएएस अधिकाऱ्यांसाठी शिक्षेचा विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज शिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव पदी करण्यात आली. त्यांच्यासह आठ आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या करण्यात आल्या. जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक …

Read More »

भीमा-कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीची परस्परविरोधी भूमिका एनआयएला तपास देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा

मुंबईः विशेष प्रतिनिधी पुणे येथील भीमा-कोरेगांव येथील हिंसाचार प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडून एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्याचा निर्णय केंद्राने घेतला. केंद्राच्या या निर्णयास राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला. मात्र महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणाचा तपास एनआयएला सुपूर्द करण्याची भूमिका घेतल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगत …

Read More »