Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

शाळा, रूग्णालये, पोलिस, अग्निशामक दलाला पाच दिवसीय आठवड्याचा लाभ नाही सकाळी ९.४५ला कार्यालये सुरू होणार

मुंबईः प्रतिनिधी शासकिय कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने पाच दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयातून शासकीय रुग्णालये, चिकित्सालये, पोलीस, कारागृहे, पाणी पुरवठा प्रकल्प, अग्निमशन दल, सफाई कामगार, शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, तंत्रनिकेतने आदी वगळण्यात आली आहेत. तसेच दापोडी, सातारा, वर्धा, अकोला, अहमदनगर, अष्टी, खडकवासला, नाशिक व नांदेड येथील …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हातातील माहिती जनसंपर्क व सामान्य प्रशासनाकडूनच लपवाछपवी सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या एकवर्षाच्या कंत्राट मुदतवाढीसाठी जुन्या तारखेचा आधार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागाने खास मर्जीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यासाठी चक्क लपवाछपवीचा कार्यक्रम सुरु आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याची मुदत संपल्यानंतर खास त्यास मागील तारखेचा अध्यादेश काढत मुदत दिल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. राज्य सरकारने …

Read More »

अर्थमंत्री पवारांचा विरोध डावलून पाच दिवसांचा आठवडा होणार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ५ दिवसाचा आठवडा करावा अशी मागणी शासकिय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून करण्यात येत होती. आता ही मागणी फलद्रुप होण्याची चिन्हे दिसत असून या प्रस्तावास अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तीव्र विरोध असला तरी हा प्रस्ताव राज्य सरकारकडून मान्य करण्यात येणार असल्याची …

Read More »

हिंगणघाटमधील पीडीतेला सरकारकडून १० लाखाची मदत महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती

मुंबई-अचलपूरः प्रतिनिधी हिंगणघाट येथील दरोडा गावातील एका प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडीतेचा आज अखेर मृत्यू झाला. या पीडीतेच्या मृत्यूने संबध महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून तिच्या नातेवाईकांना  १० लाख रूपयांची मदत राज्य सरकारच्यावतीने मंजूर करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. …

Read More »

सत्ताधारी म्हणाले जलदगतीने न्याय देणार तर विरोधकांकडून कठोर न्यायाची मागणी पीडीत जखमी तरूणीने घेतला सकाळी ६.५५ मिनिटांनी अखेरचा श्वास

मुंबईः प्रतिनिधी हिंगणघाट तालुक्यातील एका प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करत तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न माथेफिरूने केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडीत प्राध्यापिकेची अखेर मृत्यूशी झुंज संपल्याने याप्रकरणातील हल्लेखोराला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सदर प्रकरणात जलदगतीने …

Read More »

बांधकाम क्षेत्रातल्या एका “बॉस” ची मंत्रालयात चलती पक्षश्रेष्ठींशी संबधित असल्याने मंत्र्याकडूनही त्यांचे आगतस्वागत

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयात सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उत्तुंग व्यक्तीमत्वांची आवकजावक वाढली आहे. त्यातच राज्य मंत्रीमंडळातील गृहनिर्माण विभागाच्या एका वरिष्ठ मंत्र्याने त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्या जवळच्या व्यक्तीला त्याच्या मर्जीने शासकिय निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने या बॉस नामक व्यक्तीच्या इशाऱ्यावर विभागाचा कारभार चालणार की जनतेसाठी चालणार असा प्रश्न मंत्रालयातील …

Read More »

महिला व बालकांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्यांची गय नाही गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून यात हयगय करणाऱ्यांना माफी नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस यंत्रणेतील कोणतीही व्यक्ती, मग ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी जे या कामात टाळाटाळ करतील किंवा विलंब लावतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबधित गुन्हेगारांवर …

Read More »

देशाबाहेर काढणारा कायदा नसल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर समर्थन करावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएबदद्ल गैरसमज आहेत. हा कोणालाही देशाबाहेर काढण्याचा कायदा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच म्हणाले. त्यामुळे त्यांनी आता सीएएच्या समर्थनाची उघड आणि स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे यांची बुधवारच्या मुलाखतीतील …

Read More »

रखडलेल्या “गृहनिर्माण” प्रकल्पातून बिल्डरांचा होणार “महाविकास” अर्थसहाय्याबरोबरच, प्रिमियम सुट, एफएसआय वाढीव देणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी शहरातील रखडलेल्या झोपडपट्ट्यांचे पुर्नविकास प्रकल्प, म्हाडा वसाहतीतील पुर्नविकास प्रकल्पांची कामे मार्गी एकाबाजूला राज्य सरकारने पुढाकार घेतला असला तरी या पुढाकाराच्या नावाखाली चक्क मर्जीतील बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठी राज्य सरकारमधील एका वजनदार मंत्र्याने भलताच पुढाकार घेतल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने दिली. गेल्या अनेक वर्षापासून एसआरएचे जवळपास …

Read More »

विषय एकच, सनदी अधिकारीही एकच मात्र चौकशीसाठी नियुक्ती दोनवेळा पत्राचाळ प्रकरणी माजी अधिकारी जोसेफ यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडून पुन्हा नियुक्ती

मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबईतील म्हाडाच्या पुर्नविकासात झालेल्या गोंधळामुळे अनेक वर्षापासून रहिवाशांना हक्काची घरे मिळाली नाहीत. याची गंभीर दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी सनदी अधिकारी जॉनी जोसेफ यांची नियुक्ती चौकशी करण्यासाठी केली होती. आता त्याच विषयावर पुन्हा चौकशी कम शिफारसीसाठी याच सनदी अधिकाऱ्यांची विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी …

Read More »