Breaking News

महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर भाजपाची तिसरी जागा धोक्यात आणण्यासाठी आघाडीकडून दोन जण उतरणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यसभेवरील राज्यातील सात खासदारांची मुदत संपत आहे. या ७ पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. तर ५ वा उमेदवार महाविकास आघाडीकडून संयुक्तरित्या उभा करण्यात येणार आहे. मात्र भाजपाकडून आतापर्यंत फक्त दोनच जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्रातून पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार आहेत. तर भाजपाकडून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचे नाव अंतिम मानन्यात येत आहे. या निवडणूकीत मावळत्या चेहऱ्यांना पुन्हा संधी न देण्याचे धोरणे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने स्विकारल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यसभेच्या या ७ जागांसाठी विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत. विद्यमान परिस्थितीत काँग्रेसचे ४४ आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४, शिवसेनेचे ५६, शेकाप १, समाजवादी पार्टी २, बहुजन विकास आघाडीचे ३, प्रहार संघटना २, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, सीपीआयएम १ आदी आमदार महाविकास आघाडीचे आहेत. तर भाजपाचे १०५, एमआयएमचे २, मनसे १, सीपीआयएम १, जनसुराज्य १ आणि अपक्ष १३ आमदार विधानसभेत आहेत.
राज्यसभेच्या ७ जागांकरीता २८८ आमदार मतदान करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या वाट्याला ३७ आमदारांची मते मिळाल्यास तो उमेदवार विजयी ठरणार आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचे ४ उमेदवार विजयी होवू शकतात. तर भाजपाचे तीन उमेदवार जिंकून येवू शकतात. मात्र भाजपाची ३ जागा धोक्यात आणण्यासाठी महाविकास आघाडीकडून ५ उमेदवार रिंगणात उतरविण्यात येणार आहे.
राज्यसभेतून निवृत्त होणारे सदस्य
हुसेन दलवाई (काँग्रेस), अमर साबळे (भाजपा), राजकुमार धूत (शिवसेना), शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), अब्दुल माजीद मेनन (राष्ट्रवादी काँग्रेस), रामदास आठवले (भाजपा), संजय काकडे (भाजपा पुरस्कृत अपक्ष).

Check Also

दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचाऱ्यांना नायब राज्यपालांकडून नारळ

दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचाऱ्यांना नायब राज्यपाल व्ही. सक्सेना यांनी २ मे रोजी दिल्ली महिला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *