Breaking News

Tag Archives: balasaheb thorat

नातू मुख्यमंत्री ठाकरेंच्या नजरेतून आजोबा प्रबोधनकार ठाकरे ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई: प्रतिनिधी शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे …

Read More »

उद्घाटन चिपी विमानतळाचे पण फटाके उडविले राणे आणि मुख्यमंत्री ठाकरेंनी कोकणात रंगला शाब्दीक सामना

सिंधुदूर्ग (चिपी विमानतळ) : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आणि केंद्रिय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, मध्यम आणि लघु मंत्री नारायण राणे, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, ” संपूर्ण राज्य हाच माझा मतदारसंघ” अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा लाभ मतदारसंघातील नागरिकांना देण्यासाठी सजग राहून पाठपुरावा करावा

मुंबई: प्रतिनिधी अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून प्रत्येक ठिपका हा राज्याचा मतदारसंघ आहे, हे मतदारसंघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होणार आहे त्यात आपल्याला विकासाचे रंग भरावयाचे आहेत. त्यातूनच विकसित राज्याची सुंदर रांगोळी आपल्याला रेखाटता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा अधिकाधिक लाभ …

Read More »

चळवळ नाहीशी करणाऱ्या प्रवृत्तींना नाहीसे केले पाहिजे सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी संपूर्ण देशाला सहकाराचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सहकार चळवळीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रात रुजलेली सर्वसामान्य माणसाच्या हिताची ही चळवळ मोडून काढणे कुणालाही शक्य होणार नाही असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकविसाव्या शतकातील सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेणे, या क्षेत्रातील उणिवा …

Read More »

भाजपाच्या टीकेनंतरही नीती आयोगाने केले कौतुक : मुंबईसह या प्रश्नी आश्वासन केंद्राकडील राज्याच्या प्रलंबित विषयांना त्वरेने मार्गी लावणार

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या २ ऱ्या लाटेनंतर संभावित ३ ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने काही निर्बंध राज्यातील जनतेवर लादत अनेक गोष्टी खुल्या केल्या. मात्र या निर्बंधावरून भाजपा नेत्यांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक नीती आयोगाने केले. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर आणण्यासाठी …

Read More »

देशाच्या संपत्तीचे मालक नागरिक: लुटणाऱ्यांविरोधात काँग्रेस करणार संघर्ष केंद्रातील जुलमी, अत्याचारी भाजपा सरकारविरोधात पेटून उठा!: नाना पटोले

सातारा-मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भाजपा सरकार आपली राष्ट्रीय संपत्ती दोन चार उद्योगपती मित्रांच्या घशात घालत आहे. देशातील रस्ते, रेल्वे स्टेशन, रेल्वेमार्ग, ऊर्जा विभाग, गॅस पाईपलाईन, टेलिकॉम सेक्टर, गोडावून, खाणी, विमानतळे, बंदरे अशी पायाभूत क्षेत्रे उद्योगपतींना ६ लाख कोटी रुपयांसाठी ४० वर्ष लीजवर दिली आहेत. देशाची संपत्ती खाजगी लोकांना विकण्याचा सपाटाच लावला …

Read More »

ओबीसी आरक्षण : डेटा नाहीतर निवडणूकाही नाही इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्यादृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करावा, यासंबंधीचे निर्देश राज्य मागास वर्ग आयोगास देण्यात यावेत यावर आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत एकमताने सहमती देण्यात आली.त्याचबरोबर हा डेटा गोळा करण्यास उशीर होणार असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका …

Read More »

महाविकास आघाडीचे नेते राजभवनावर राज्यपाल म्हणाले, “योग्य निर्णय घेईन” राज्यपाल नियुक्त १२ सदस्य नियुक्तीबाबत अद्यापही कोणताही निर्णय नाहीच

मुंबई : प्रतिनिधी मागील ९ महिन्यापासून राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपालांना पाठवूनही त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे याप्रश्नी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विनंती करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज राजभवनावर जात राज्यपालांची भेट घेवून विनंती केली. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी खुषखबर: आता मोफत घरपोच सातबारा मिळणार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा

श्रीरामपूर : प्रतिनिधी महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता २ ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी घेण्यात येत असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर येथे केली. नागरिकांना सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल …

Read More »

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वांचेच एकमत: अंतिम निर्णय येत्या ७ दिवसानंतर प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या …

Read More »