Breaking News

Tag Archives: balasaheb thorat

राहुल गांधी यांच्यासाठी प्रदेश काँग्रेसने केले ‘हे’ दोन ठराव मंजूर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी (AICC delegate) यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे …

Read More »

काँग्रेसचा सवाल, महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का ? १.५८ लाख कोटींचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातलाच कसा गेला ? बाळासाहेब थोरात

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने …

Read More »

गेले अशोक चव्हाण कुणीकडे? जाहीर केलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेला गायब आज सोमवारच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा मुंबईत येताच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेस उपस्थित राहू शकते नाहीत. आयोजित केलेल्या महत्वाच्या पत्रकार परिषदेस चव्हाण यांनी दांडी मारल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अधिक खळबळ माजली आहे. आता हाही योगायोग असावा का असे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे …

Read More »

चव्हाण-फडणवीसांच्या भेटीवरून काँग्रेसच्या नेत्यांकडून डॅमेज कंट्रोल भेटीबाबत आणि चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या अफवा

गुरूवारी रात्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आशीष कुलकर्णी यांच्या वरळी येथील निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचे वृत्त आज बाहेर येताच अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जाणार या चर्चेला सुरुवात झाली. त्याचबरोबर अशोक चव्हाण हे जर भाजपात गेले तर चव्हाण यांचे समर्थक असलेले एकूण …

Read More »

बाळासाहेब थोरात म्हणाले, २४ तासात भाजपाचे तीन नेते राज यांना भेटले यावरून संकेत स्पष्ट… पूर्वीचे लाव रे व्हिडीओ म्हणणारे राज ठाकरे खरे होते

जवळपास एक वर्षापासून भाजपा आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या ज‌वळकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपाची युती होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र प्रत्येक वेळी भाजपाबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु राज ठाकरे यांच्या भेटीला भाजपा नेते जाण्याच्या कृतीत कोणताही खंड पडला नाही. त्यातच गणेशोत्सवाच्या …

Read More »

सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग आंदोलन करणे विरोधकांचा अधिकार, सत्ताधाऱ्यांचा विधानभवन परिसरातील प्रकार दुर्दैवी-बाळासाहेब थोरात

अधिवेशनातून आपल्यासाठी काही मदतीचा हात देणारा निर्णय होईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दररोज ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत तर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करत आहे आणि विधीमंडळाच्या पायऱ्यावर मात्र सत्ताधारी आमदार विरोधकांना धक्काबुक्की करतानाचे चित्र पाहिल्यानंतर शेतकरी व …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, हायवे समस्यांवर काही ठोस धोरण आहे का ? खराब महामार्गामुळे नाशिक-मुंबईसाठी ३ तासाऐवजी ६ तास लागतात

महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे. नाशिकहून मुंबईचा प्रवास हा फक्त ३ तासांचा आहे परंतु खराब महामार्गामुळे त्यास ६ तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात हे लक्षात घेता राज्य सरकारचे महामार्गाच्या संदर्भात काही ठोस धोरण आहे …

Read More »

बाळासाहेब थोरात म्हणाले, लोकशाही राहील की नाही अशी परिस्थिती… पंतप्रधान मोदींच्या ‘घर घर तिरंगा’ला काँग्रेसकडून ‘स्वातंत्र्याचा गौरव’ यात्रेचे उत्तर

मागील काही दिवसांपासून बंद करण्यात आलेली नॅशनल हेराल्ड केस पुन्हा नव्याने ओपन करून ईडीकडून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त घर घर तिरंगा अभियानाची घोषणा केली. या अभियानाला प्रत्युत्तर …

Read More »

बाळ‌ासाहेब थोरात यांचा सवाल, ते निर्णय घेण्याचे फलित काय ? भाजपाच्या द्रौपदी मुर्मूंना शिवसेनेने दिलेला पाठिंबा जनतेला आवडला नाही..

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचे काम केल्याचे दिसून येते. जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला पण तो घेण्याआधी त्याचे फलित काय? हे तपासणे आवश्यक होते. हा निर्णय जेव्हा पूर्वी झाला, तेव्हा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत व्यवस्थित चालते आहे का? हे जर त्यांनी तपासले असते तर …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, कोणत्या कायद्याच्या आधारे अध्यक्ष पदाची निवडणूक घेणार? महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कायद्यानुसार की जून्या कायद्यानुसार

मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील सुप्त तरी कधी उघड संघर्ष सातत्याने पहायला मिळाला. तसेच काही महिन्यांपूर्वी विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीने अध्यक्ष पदाच्या कायद्यात दुरूस्ती करत त्या आधारे निवडणूक प्रक्रिया जाहिर करावी अशी मागणी केली. परंतु राज्यपालांनी रिक्त अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया जाहिरच केली …

Read More »