Breaking News

अबु आझमी म्हणाले, एक महिना द्या सगळं बंद करून दाखवतो राज्य सरकारला आव्हान मादक द्रव्ये बंद करा अन्यथा

मुंबईः विशेष प्रतिनिधी

मुंबईतील अनेक भागात नशेली पदार्थ मिळत आहेत. अशा पध्दतीच्या पदार्थांची विक्री बंद करणे राज्य सरकारच्या हातून होणार नसेल तर माझ्या हातात द्या एक महिन्यात अशा गोष्टी बंद करून दाखवतो असे आव्हान समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी राज्य सरकारला दिले. या आव्हानाची तात्काळ दखल घेत विधानसभाध्यक्ष पटोले यांनीही गृहमंत्र्यांनाही यात लक्ष घालण्याचे आदेश दिले.

विधानसभेत औचित्याचे मुद्दे उपस्थित करताना मानखुर्द, शिवाजी नगर यासह अन्य काही भागात नशा आणणाऱ्या पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्यात येते. तसेच या गोष्टींकडे डोळेझाक करण्यासाठी पोलिसांकडून हप्तेही घेतले जात असल्याचा मुद्दा अबु आझमी यांनी उपस्थित केला.

यासंदर्भात मागील सरकारच्या काळात अनेकवेळा प्रश्न उपस्थित केला. मात्र त्यावेळचे गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा आपण उपस्थित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातील यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आझमी यांना हा विषय आपण अनेकवेळा उपस्थित केलात. दुसरे काही असेल तर सांगा असे सांगितले.

त्यावर आझमी म्हणाले की, जर सरकारला या गोष्टी बंद करता येत नसतील तर माझ्या हातात द्या एका महिन्यात बंद करून दाखवतो असा इशारा देत नशेने तरूण पिढी बरबाद होत असल्याची बाबही सभागृहाच्या नजरेसमोर आणून दिली.

त्यावर अखेर विधानसभाध्यक्ष पटोले यांनी गृहमंत्र्यांनी यासंदर्भात माझ्या दालनात बैठक घेवून कारवाई करावी असे निर्देश दिले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *