Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

परदेशी प्रवास आणि लक्षणे असतील तरच कोरोना चाचणी होणार मुंबईसह ८ ठिकाणी चाचणी केंद्रे सुरु करणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

पुणेः प्रतिनिधी कोरोना व्हायरसची अनुषंगाने समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरत आहेत. त्यामुळे एखादा परदेशी प्रवास करून आला असेल आणि एखाद्यामध्ये तशी लक्षणे दिसत असतील तरच त्या व्यक्तीची कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एनआयव्ही फाऊंडेशन संस्थेला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …

Read More »

शासकिय कार्यालयांचे कमी संख्येत कामकाज चालविण्याचा विचार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांची मदत आवश्यक मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोना आजाराच्या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. मात्र परिस्थिती नियंत्रणात असली तरी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सरकारी कार्यालयात कमी उपस्थितीत कामकाज चालविण्याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत या आजाराचा सामना करण्यासाठी नागरिकांच्या मदतीशिवाय शक्य होणार नसल्याने नागरीकांनी गरज असेल तरच बाहेर …

Read More »

कोरोना इम्पॅक्टः पुणे आणि मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्या २३ गाड्या बंद मध्य रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईहून पुणेला जाणाऱ्या आणि पुणेहून पुढे लांब जाणाऱ्या रेल्वे एक्सप्रेस, मेल गाड्या बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईला येणाऱ्या २३ गाड्याही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. या सर्व गाड्या १९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत …

Read More »

कोरोना इम्पॅक्टः मंत्रालयात बायोमेट्रीक हजेरी बंद, स्वच्छतेवर भर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील कर्मचारी- अधिकाऱ्यांचा कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याच्या उद्देशाने बायोमेट्रीक हजेरी आजपासून बंद करण्याचा निर्णय घेत दर एक तासाला स्वयंचलित पायऱ्या (इस्केलेटर) , काचेच्या भिंती, फरश्यांची स्वच्छता आदी गोष्टींवर प्रशासनाने भर देण्यास सुरु केली आहे. मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आदी भागात कोरोनाचे रूग्ण …

Read More »

मंत्रालयात प्रवेश बंदी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन महिन्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला बैठकीत निर्णय

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात उद्यापासून सर्वसामान्य नागरीकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना सर्व माफ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खास सवलत

मुंबईः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आज पार पडले. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांना सर्व गोष्टी माफ असून त्यांनी किमान पुढील अधिवेशनात चर्चांना उत्तरे द्यावीत अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मंत्रालय व विधिमंडळात आयोजित पत्रकार परिषदेत ते …

Read More »

कल्याण-डोंबिवलीतील त्या २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेत निवेदन

मुंबई : प्रतिनिधी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी १८ गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात येणार आहे. यापैकी ९ गावे आजदे, सागाव, नांदविली, पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा ही गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आली असून उर्वरित १८ गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

राज्यातील सर्व खाजगी-सरकारी शाळा, प्रशिक्षण केंद्रे ३१ मार्चपर्यंत बंद आरोग्य विभागाकडून आदेश जारी

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि शालेय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि पंचायत क्षेत्रातील सर्व शासकिय आणि खाजगी शाळा, प्रशिक्षण केंद्रे ३१ मार्च अखेर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने एका परिपत्रकान्वये जारी केले. मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूपासून आजारी पडणाऱ्या संख्येत …

Read More »

नांदेडमधल्या कामेश्वरच्या धाडसाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी शिफारस

मुंबई: प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातील, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या १४ वर्षाच्या आठवीतील धाडसी विद्यार्थ्यांने, मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या,  दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. कामेश्वरीने नदीत उडी घेऊन मोठ्या धाडसाने या दोघा मुलांना नदीतून बाहेर काढले. या कौतुकास्पद कार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनातील त्यांच्या …

Read More »

खुल्या प्रवर्गातील पदांमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार मागासवर्गीयांना पदोन्नती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील पदोन्नतीतील आरक्षणाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मात्र सध्या खुल्या प्रवर्गातील पदे भरण्यात येत असून त्यामध्ये मागासवर्गीयांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधान परिषदेत दिली. तसेच  कायदेशीररित्या आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी ज्येष्ठ व निष्णात वकिलांची नेमणूक करण्यात आली असून पदोन्नतीतील …

Read More »