Breaking News

निर्णय घेत नसल्याने तरूणाचा मंत्रालयाच्या दारातच आत्महत्येचा प्रयत्न कृषी परिक्षेच्या निकालाबाबत निर्णय होत नसल्याने तरूणाचे कृत्य

मुंबई : प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातल्या धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर अहमदनगरच्या एका २५ वर्षीय तरुणानं मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अविनाश शेटे असं या तरुणाचं नाव असून

अहमदनगरच्या राहणाऱ्या अविनाशने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र, त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. परिक्षेचा निकाल लागत नसल्याने अखेर राज्य सरकारच्या या भोंगळ कारभाराच्या विरोधात शेटेने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.

अखेर वैतागलेल्या अविनाशनं आज (बुधवार) मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. साध्या वेषातील पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी अविनाशला वेळीच ताब्यात घेतल्याने त्याला सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. मात्र, यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयातील कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्याचबरोबर एकदंरीतच सरकारच्या ध्येयधोरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

 

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *