Breaking News

वंचित आघाडीला मतदान करणाऱ्या दलित मतदारांवर हल्ले दलित कार्यकर्त्यांकडून जिल्हा पोलिस प्रशासनाकडे तक्रार

सोलापूरः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबतच भारीप बहुजन-महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची स्थापना करत निवडणूक लढविली. मात्र या प्रस्थापित राजकिय पक्षाला मतदान न करता वंचित आघाडीला मतदान का केले या कारणास्तव दलित-उपेक्षित कामगारांना जातीयवाद्यांनी त्रास आणि त्यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली.
याबाबत सोलापूरातील सर्व दलित कार्यकर्त्यांनी एकत्रित येत यासंदर्भात लेखी निवेदन पोलिस अधिक्षकांना दिले. लोकसभा निवडणूकीत फक्त युती किंवा आघाडीलाच मतदान करण्यासंदर्भात सोलापूरातील ग्रामीण भागातील सत्ताधीश आणि जातीयवाद्यांकडून दलित समाजातील मतदारांना सांगण्यात येत होते. मात्र अनेक दलित बांधवांनी प्रस्थापित राजकिय पक्षांऐवजी वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांना मतदान केले. त्याचा राग मनात धरून उच्चवर्णीय समाजातील जातीयवाद्यांकडून दलित कामगारांचे रोजगार काढून घेणे आणि त्यांना मारहाण करणे सारखी कृत्ये करत आहेत.
या पध्दतीच्या घटना मंगळवेढा येथे बोराळे येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 29 /4/ 2019 रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या वेळेत मिरवणूक काढण्यात सालाबादप्रमाणे मिरवणुकीत तरुण युवक युवती अपंग वृद्ध महिलांचा समावेश होता. सदर मिरवणुकीच्या शेवटी शासकीय नियमानुसार रात्री दहा वाजता बंद केल्यावर काही समाज कंटकांनी दमदाटी करून शिवीगाळ करून डॉल्बी परत लावण्यासाठी जबरदस्ती करत मारहाण केली. याबाबत मंगळवेढा ग्रामीण पोलिसात दिनांक 30/ 4 /2019 रोजी दाखल केली आहे वास्तविक दिनांक 29 /4/ 2019 रोजी रात्री पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्यावर दिनांक 30 /4 /2019 रोजी सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी तक्रार घेतली
2 ) मंगळवेढा येथील उचेठाण येथे प्रचार केल्याचा राग मनात धरून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्या कडून मारहाण केली.
3) पंढरपूर येथील ईश्वर पठाण येथील वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा महासचिव माऊली हळणकर तानाजी हळणकर यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. आदी घटना घडल्या आहेत.
तर वंचित बहुजन आघाडीचा प्रचार केला म्हणून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत. तरी ग्रामीण भागातील वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करणाऱ्या सर्व समाज बांधवांना ग्रामीण पोलिसांकडून संरक्षण मिळणे बाबत अतिशय कठोर पाऊल उचलावे अशी मागणी करत त्यांच्या विरोधात प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दलित कार्यकर्त्ये
नगरसेवक आनंद दादा चंदनशिवे, नगरसेवक रवि गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, दशरथ कसबे, बबन शिंदे, अजित गायकवाड, कोंडीबा वाघमारे, शिवाजी वाघमारे, भीमा वाघमारे, जालिंदर वाघमारे, मोहन वाघमारे, महादेव वाघमारे, दीपक रणदिवे, शैलेंद्र रणदिवे, सागर कांबळे, शांतीकुमार नागटिळक, आश्‍विन शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना लेखी निवेदनाद्वारे दिला.

Check Also

आतंरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या ५० मध्ये या भारतीय शैक्षणिक संस्थाचा समावेश

एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसात जगभरातील विद्यापाठांची QS ने जागतिक क्रमवारी जाहिर केली असून या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *