Breaking News

उद्या पंतप्रधान मोदींचा दौरा, पण नाराज राज्यपाल कोश्यारींची कार्यक्रमाकडे पाठ राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करूनही अद्याप आदेश आला नसल्याने राज्यपालांचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्ये करत अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठविली. यापार्श्वभूमीवर सातत्याने साधारणतः महिनाभरापूर्वी मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची विनंती केली होती. याबाबतची अधिकृत माहिती राजभवनाकडून जारी करण्यात आली होती. त्यानंतर उद्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे मातरम ट्रेन आणि बुऱ्हाणी ट्रस्टच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या ऊर्दू शाळेच्या उद्घाटन समारंभ होत आहे. मात्र या कार्यक्रमाला नाराज राज्यपाल कोश्यारी यांनी हे गैरहजर राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारच्या राजशिष्टाचार नियमानुसार पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या स्वागतासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आवर्जून उपस्थित रहावे लागते. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून अद्याप मंजूर करण्यात आली नाही. मात्र दुसऱ्याबाजूला विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारला स्थापनेसाठी दाखविलेला पक्षपात आदी गोष्टींमुळे राज्यपाल पदाचा दर्जा सातत्याने खालविला गेला असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच जनमानसातही कोश्यारी यांची प्रतिमा मलिन होत असल्याने कोश्यारी यांनी व्यथित होत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे याबाबत इच्छा व्यक्त केली होती.

राजीनाम्याची इच्छा व्यक्त केल्यानंतरही आणि भाजपाच्या अडचणीत वाढ जाणीवपूर्वक करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नाराज झालेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरविण्याचा निर्णय घेतल्याचे अन्य एका नेत्याने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा राजशिष्टाचार मंत्र्यांना हजर रहावे लागते. मात्र ते सध्या आजारी असल्याने पंतप्रधान मोदींच्या स्वागताला आणि निरोप देण्यासाठी विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. मात्र संपूर्ण दिवसभराच्या दौऱ्यात आणि जाहिर कार्यक्रमात हजर राहणार नसल्याचे राजभवनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *