Breaking News

Tag Archives: governor

उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, आमदार आणि संरक्षक म्हणून जबाबदारी… विधिमंडळाच्या शतकोत्तरी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत

शिवाजी महाराजांच्या या महान भूमीने शतकानुशतके आपल्या मातृभूमीच्या प्रगतीचे नेतृत्व केले आहे, उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मराठा स्वराज्याची तत्त्वे, त्याच्या प्रशासकीय चौकटीत विकेंद्रित राजनैतिकता, योग्यता, कायद्याचे राज्य, आर्थिक विकास आणि लोककल्याण यांचा समावेश करून, जगभरातील सार्वजनिक सेवा वितरणात अधिक कार्यक्षमता, जबाबदारी आणि उत्तरदायित्व …

Read More »

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

वसाहतवादी ब्रिटिश सरकारने भारतातील प्रदीर्घ आणि शोषणात्मक राजवटीत स्वतःच्या फायद्यासाठी अनेक कायदे केले. मात्र आता स्वातंत्र्याच्या अमृत काळात पारित केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यास तसेच न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. ‘फौजदारी कायद्यातील सुधारणा २०२३’ या विषयावर केंद्रीय विधी व …

Read More »

गर्व्हनर शक्तीकांता दास म्हणाले, चलनवाढीच्या विरोधातील लढाई सुरुच राहणार ८ टक्के जीडीपीच्या दिशेने वाटचाल सुरुच

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मंगळवारी सांगितले की, चलनवाढीविरुद्धच्या लढाईत या टप्प्यावर कोणतीही डगमगता किंवा विचलित होऊ शकत नाही, दोन चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) सदस्यांनी दर कपात करण्याच्या आवाहनानंतर त्यांनी ही भूमिका मांडली. त्यांनी असेही जोडले की भारत सातत्यपूर्ण पद्धतीने ८ टक्के जीडीपी वाढीच्या दिशेने वाटचाल करत …

Read More »

लेखिका अरूंधती रॉय यांच्यावर युएपीए अंतर्गत खटल्यास राज्यपालांची मंजूरी राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दिली मान्यता

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी कादंबरीकार अरुंधती रॉय आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय कायद्याचे माजी प्राध्यापक डॉ. शेख शौकत हुसेन यांच्यावर १४ जून रोजी युएपीए UAPA च्या कलम १३ अंतर्गत २०१० मध्ये एका कार्यक्रमात केलेल्या कथित वक्तव्याबद्दल खटला चालवण्यास मंजुरी दिली, असे राजभवनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. अरूंधती रॉय आणि …

Read More »

काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी, …राष्ट्रपती राजवट लागू करा पवईतील भीमनगर झोपडीपट्टीवरील कारवाई सरकार, प्रशासन व बिल्डराच्या संगनमताने

राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात २६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते, बियाणे, औषधे दिलेली नाहीत. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली, …

Read More »

तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वाची

देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात व्यवस्थापन लेखापालांचे योगदान लक्षणीय आहे. तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट गाठताना, व्यवसाय सुलभता वाढविण्याच्या कार्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वपूर्ण असेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन लेखांकन दिनाचे औचित्य साधून व्यवस्थापन लेखांकन व्यवसायाचे नियमन करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ …

Read More »

कोलकाता पोलिसांनी मागितले राजभवनाचे सीसीटीव्ही फुटेज

कोलकाता पोलिसांच्या चौकशी पथकाने एका महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छेडछाडीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस पुढील काही दिवसात साक्षीदारांशी बोलतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ४ मे रोजी सांगितले. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासकर्त्यांनी राजभवनाला आधीच सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्याची विनंती केली आहे. “आम्ही एक चौकशी पथक तयार केले आहे …

Read More »

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी अनेक कौशल्ये कालबाह्य होण्याची शक्यता असून त्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम प्रज्ञा कौशल्यांच्या बाबतीत अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. दृष्टिबाधित व्यक्तींना स्पर्शाने समजण्याजोग्या ‘इन्कलुसिव्ह ॲटलास इंडिया २०२४’ या नकाशांच्या पुस्तकाचे …

Read More »

राज्यपालांचे तत्कालीन सचिव संतोष कुमार करत आहेत २० लाखांच्या दंड माफीसाठी आटापिटा

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे एकेकाळी प्रधान सचिव असलेले संतोष कुमार यांनी बदली झाल्यानंतर अतिरिक्त वेळ ते राजभवनातील जलदर्शन बंगल्यात राहत होते. राजभवनाने २० लाखांचा दंड भरण्यासाठी काढलेल्या नोटीसनंतर तो दंड माफ करण्यासाठी संतोष कुमार आटापिटा करत आहे. संतोष कुमार यांनी दंडनीय दराने अनुज्ञाप्ती शुल्क माफ करण्यासाठी केलेल्या विनंतीवर कार्यवाही सुरु …

Read More »

भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे

भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्राचे आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते मंगळवारी २६ मार्च २०२४ रोजी लॉजिस्टिक उद्योगाच्या …

Read More »