Breaking News

“नवाब मलिकांची अटक”… अनं फडणवीसांचा दिवाळीनंतरचा “बॉम्ब” जमीन खरेदी प्रकरणी अखेर अंडरवर्ल्डशी मलिकांचे संबध असल्याचे दाखवून दिलेच

राज्यात ड्रग्ज व्यापार आणि बनावट नोटांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा आणि त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबधाबाबत आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका व्हिडिओचा फायनान्सर हा ड्रग्ज पेडलर असल्याचा आरोप केला होता. त्यावर दिवाळी झाल्यावर मलिकांचा बॉम्बगोळा फोडू असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे अखेर फडणवीसांनी बॉम्बगोळा फोडलाच पण उशीरानेच अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली.

साधारणत: दिवाळीच्या आधी राज्यात फेक करन्सी अर्थात बनावट नोटाप्रकरणांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधत या बनावट नोटांच्या रॅकेट मागे त्यावेळचे भाजपा आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आर्शिवाद असल्याचा आरोप करत बीकेसीमध्ये ७.५० कोटी रूपयांच्या बनावट नोटा मिळाल्यानंतर हही केस दाबण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून चक्रे हलल्याचा खळबळजनक आरोप केला. मलिकांच्या या आरोपावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांबाबतचा बॉम्ब आपण दिवाळी झाल्यावर फोडणार असल्याचा इशारा देत १९९३ सालच्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीकडून मलिक यांनी कुर्ला येथे मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप करत त्याबाबतची कागदपत्रेही दाखविली होती. तसेच यासंबधाची कागदपत्रे आपण तपास यंत्रणांना देणार असल्याचेही त्यांनी त्यावेळी पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले होते.

त्यानंतर फडणवीस हे आपल्या पत्नीच्या व्हिडीओबाबतची माहिती जाहीर केली म्हणून मलिक यांच्यावर जाणीवपूर्वक १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्याशी संबध जोडल्याचा आरोप त्यावेळी करण्यता आला होता. त्यावर फडणवीसांनी माझे आणि मलिकांची वैयक्तिक दुश्मनी नसल्याचा खुलासा केला होता.

परंतु साधारणत: चार महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर फडणवीसांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे ईडीने कारवाई सुरु केल्याचे दिसून येत आहे. साधारणत: २०१९ च्या निवडणूकीच्या आधी अचानक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानातून पळून गेल्याचा आणि त्याचा किडनीच्या आजारापणामुळे मृत्यू झाल्याच्या मध्यंतरी बातम्या देशातील अनेक प्रसारमाध्यमातून प्रकाशित झाल्या होत्या. परंतु मागील काही दिवसात दाऊद इब्राहीम, त्याचा भाऊ इक्बाल कासकर जो एका प्रकरणात आधीच अटकेत होता, त्याची बहीण हसीना पारकर यांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरु केल्याचे आणि त्याचा संबध नवाब मलिक यांच्याशी जोडण्यात आल्याचे ईडीच्या आरोपावरून दिसून येत आहे.

Check Also

आतंरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या ५० मध्ये या भारतीय शैक्षणिक संस्थाचा समावेश

एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसात जगभरातील विद्यापाठांची QS ने जागतिक क्रमवारी जाहिर केली असून या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *