Breaking News

राज्यात सुरु असलेले सुडाचे राजकारण आज जरी जनता पहात असली तरी… नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतर जयंत पाटील यांचा भाजपावर निशाणा

महाराष्ट्रात कधीच सुडाचे राजकारण नव्हते. मात्र सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. आज जरी जनता हे पाहत असली तरी जनता योग्य वेळी मत व्यक्त करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करमाळा येथे व्यक्त केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या तिसर्‍या दिवशी करमाळा येथे सभा झाली. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.

सध्या राज्यात चुकीचे वातावरण फोफावत आहे, राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कारण नसताना ईडीने अटक केली. कोणत्याही प्रकारे महाविकास आघाडी सरकार पाडायचे यासाठी राज्यातील काही जण कार्यरत आहे. कोणताही संबंध नसताना, कोणतं कारण नसताना, कोणतीही माहिती न देता केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन धाडसत्र… अटकसत्र राबवले जात आहे. हे काही योग्य वाटत नाही असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

दबावतंत्राचे राजकारण केले जात आहे. २०१९ च्या काळात भाजपमध्ये जाण्यासाठी माझ्यावरही दबावतंत्र वापरले गेले पण मी पवारसाहेबांची साथ सोडली नसल्याचे सांगत आज आपला पक्ष सत्तेत आहे. आपणही कोणत्याही दबावाखाली न येता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पवारसाहेबांचे विचार मोठ्या प्रमाणात पसरवण्यासाठी काम करा, आपल्या बुथ कमिट्या ताकदवान करा असे आवाहनही त्यांनी केले.

आपण सर्वांनी मोठी मेहनत घेऊन अपक्ष म्हणून संजयमामा शिंदे यांना करमाळ्यातून निवडून दिले. आज संजयमामा शिंदे एक लोकाभिमुख काम या भागात करत आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कार्यरत आहे, कोविडच्या काळात चांगले काम सरकारने केले. तसेच विकासकामात कोणताही खंड पडू नये याची खबरदारी घेतली. करमाळ्यातील पाण्याच्या व्यवस्थेसाठी वारंवार बैठका संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईत घेतल्या. येत्या काळात इथले पाण्याचे सर्व प्रश्न सोडवण्याचे काम केले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील – जयंत पाटील

हा आणखी एका सत्तेचा दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे ही सर्वच गोष्टीची पायमल्ली आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

अलीकडच्या काळात नवाब मलिक यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. वेळोवेळी त्यावर आवाज उठवला होता म्हणून कदाचित नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचे काम असेल असे मत व्यक्त करत जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय?

मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *