Breaking News

अटकेनंतर न्यायालयात ईडी आणि नवाब मलिकांकडून कोणता केला युक्तीवाद? वाचा ईडी म्हणते नवाब मलिकांचा संबध डी गँगच्या सात मालमत्तांशी

राज्याचे मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने आठ तासाच्या चौकशीनंतर अटक केली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ईडीने मलिक यांना दिवाणी न्यायालयात हजर केले. त्यावेळी ईडीकडून नवाब मलिक यांना १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली.

यावेळी ईडीने मलिक यांच्यावर आरोप करताना म्हणाले की, दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. दाऊदची अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती आहे. ३ फेब्रुवारीला दाऊद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाऊदची भारतातील हस्तक तीची बहिण हसिना पारकर ही असून तिच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करत होता. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा केली. हसिना पारकर आणि नवाब मलिक यांचे आर्थिक संबध होते. तसेच अंडरवर्ल्डशी नवाब मलिक यांचा संबध असून अंडरवर्ल्डशी संबधित संपत्ती नवाब मलिकांनी खरेदी केल्याचा आरोपही ईडीने केला.

याचबरोबर कुर्ला येथील संपत्ती ही मुळात डी गँगच्या हस्तकाशी संबधित तीच संपत्ती मलिकांच्या कुटुंबियांनी खरेदी केली. हसिना पारकर हीचा ड्रायव्हर सलिम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबियांनी जमिन खरेदी केली असून या खरेदी व्यवहारात रोख रकमेचा व्यवहार झाला असून कोणत्याही चेक किंवा आरटीजीएस प्रणालीचा वापर झाला नसल्याचा आरोप करत हे दिलेले रोख पैसे देश विघातक कामासाठी वापरले गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच्या अधइक तपासासाठी १४ दिवसांची ईडी कोठडी द्यावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली. ईडीच्यावतीने अॅटर्नी जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली.

तर नवाब मलिक यांच्यावतीने वकील अमित देसाई यांनी बाजू मांडताना म्हणाले की, सकाळीच ईडीचे अधिकारी माझ्या घरी दाखल झाले, त्यांनी मला जबरदस्तीने ई़डी कार्यालयात आणलं, आपल्याला जबरदस्तीने अटक केली असून याप्रकरणी कोणतेही समन्स न देता आपल्याला या ठिकाणी आणण्यात आले आणि सही घेण्यात आली. ईडीकडून कोणत्या कारणाखाली कारवाई करण्यात आली याची माहिती दिली नाही. त्याचबरोबर कारवाई करण्यापूर्वी किंवा कोणतीही प्रतिबंधक कारवाई करण्यापूर्वी ईडीने कोणतीही माहिती दिली नाही. ज्या सलिम पटेलचा उल्लेख ईडीकडून केला जातोय तो दुसराच व्यक्ती आहे. मलिकांनी जमिन खरेदी केली तो सलिम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर नसून तो दुसराच व्यक्ती असल्याचा युक्तीवाद केला.

जवळपास दिडतासाहून अधिक काळ ईडी आणि नवाब मलिकांच्या वकीलांकडून युक्तीवाद करण्यात येत होता.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *