Breaking News

अहो फडणवीसजी, सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठविलेल्या पत्रांचे काय झाले? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांना खोचक सवाल

मुंबईः विशेष प्रतिनिधी

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनवेळा पत्र लिहून वीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी केली होती. परंतु यामध्ये नेमकी काय अडचण आली याचं उत्तर मिळालं पाहिजे अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत भाजपाचा सावकरप्रेमाचा बुरखा फाडला.

वीर सावरकर यांचा विधानसभेत गौरव करण्याचा प्रस्ताव विरोधकांनी मांडून त्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विरोधी पक्षाच्यावतीने गोंधळ घालण्यात येत होता.

आपलं कामकाज प्रथेनुसार चालतं. आजच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृती दिन आला आहे असं नाही. यापुर्वीही येवून गेला आहे. त्यामुळे मी वीर सावरकरांना आदरांजली वाहतो. त्यांच्या कामाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु सुधीर मुनगंटीवार व इतर नेत्यांना नेमकं काय राजकारण करायचं आहे की कोणता स्वार्थ साधायचा आहे हेच कळत नसल्याचे ते म्हणाले.

वीर सावरकरांचे योगदान कोण विसरु शकत नाही. मात्र त्यांचे वेगवेगळे विचार होते. बैल, गायी याबद्दल काय बोलत होते. ते बोलून काही वाद निर्माण करायचे नाही. प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. असे सांगतानाच त्यांना भारतरत्न मिळावा अशी आमचीही मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सावरकरांबद्दल शिदोरी मासिकात छापून आलेला मजकुर वाचून दाखवत वातावरण बिघडवू पहात असतानाच राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सावरकरांचा अवमान विरोधी पक्षनेतेच करत आहेत. सन्मान देण्याचा विचार करता आणि त्यांच्याविषयी सभागृहात वाईट वाचून दाखवता हे योग्य नसल्याचे खडेबोल सुनावले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न द्या ही आमचीही मागणी आहे. राज्य सरकारच्या वतीने माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दोन पाठवला आहे. केंद्रात अजूनही भाजपचेच सरकार असूनही भारतरत्न देण्यासाठी एवढा उशीर का, असा सवाल करीत सावरकरांच्या स्मृतिदिनी राजकीय स्वार्थ साधण्यापेक्षा आधी सावरकरांना भारतरत्न द्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तुमच्याही अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही आणतो, असे सडेतोड उत्तर राज्याचे सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी देत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजपचा डाव शिवसेना, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हाणून पाडला.

विधानसभेचे तिसर्‍या दिवसाचे कामकाजातील प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व स्थगनचे प्रस्ताव फेटाळले. यावेळी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. मात्र ही स्थगनची सूचना होऊ शकत नसल्याचे सांगत अध्यक्षांनी मुनगंटीवार यांना प्रस्ताव वाचून दाखविण्यास सांगितले. मात्र या प्रस्तावात मुनगंटीवार यांनी असे काही लोक आहेत की त्यांच्या देहावर दुसर्‍याच्या मेंदूचे नियंण आहे, अ‍े लोक सावकरांविषयी अवमानजनक वक्तव्य करीत असल्याने हा प्रस्ताव आणण्यात आल्याचे सांगताच अध्यक्षांनी ही स्थगनची सूचना होऊ शकत नाही, असे सांगत स्थगन प्रस्ताव मांडला. यालाच दुजोरा देत छगन भुजबळ यांनी नियमांचे पुस्तक वाचून दाखवत कोणते व्यक्रोक्तीपूर्ण, अपमानास्पद वक्तव्य करता येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

‘शिदोरी’वर बंदी घाला

काँग्रेसच्या शिदोरी या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपामनजक उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ‘शिदोरी’वर बंदी घाला अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचप्रमाणे सावरकरांचा गौरवाचा ठराव मांडावा अशी मागणी केली. मुनगंटीवार यांनीही गौरव प्रस्तावावर चर्चा न घेता दोन ओळीचा ठराव मांडावा अशी मागणी केली.

मात्र विरोधकांनी प्रस्तावावर चर्चा करण्याचीच मागणी रेटून धरली. या गोंधळात सत्ताधाऱ्यांकडून विधानसभेचे कामकाज रेटून नेले. मात्र विरोधकांकडून गोंधळ सातत्याने करण्यात येत असल्याने अखेर सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *