Breaking News

फडणवीसांची सूचना अजितदादांचा होकार आणि सुधीरभाऊ म्हणाले मोघम नको कर्जमाफीची व्याप्ती वाढविण्याचे आश्वासन

मुंबईः विशेष प्रतिनिधी

काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीने औटघटकेचे सरकार भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केले. मात्र त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही तोच अजित पवारांच्या युटर्नमुळे कोसळले. त्यानंतर हे दोन नेते विधानसभेत कसे एकमेकांना सामोरे जाणार अशी उत्सुकता लागून राहीलेली. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नी फडणवीसांनी सूचविलेली सूचना तात्काळ अजित पवारांनी स्विकारल्याने आणि त्यातील स्पष्टता मुनगंटीवारांनी वदवून घेतल्याने या दोन्ही नेत्यांनी एकमेकाला चांगलेच समजून घेतल्याचे चित्र विधानसभेत पाह्यला मिळाले.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र या कर्जमाफीच्या योजनेपासून रब्बी हंगामात पिके घेणारे जिल्हे आणि अवकाळी पावसामुळे कर्ज रखडलेले शेतकरी वंचित रहात असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच कर्जमाफीच्या योजनेत या भागातील शेतकऱ्यांचा समावेश करावा अशी सूचना करत या योजनेचा लाभ ९४ लाख शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा असा सल्ला त्यांनी दिला.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांच्या सूचनेवर तात्काळ सजेशन फाँर अॅक्शन असे सांगत सूचना स्विकारल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोघम उत्तरे नको असे सांगत विरोधी पक्षनेत्यांनी सूचविलेल्या सूचनांवर होय किंवा नाही असे उत्तर द्यावे सांगत शेतकऱ्यांना काही कारणास्तव पैसे देता येत नसेल तर तसे स्पष्ट सांगावे. राज्याची परिस्थिती पाहता निधी उभारण्याची गरज असेल तर आम्ही मदत करायला तयार असल्याचे दाखविली.

त्यावर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतच्या सर्व सूचना आणि माहिती तपासून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

सोलापूरातील शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफीचा लाभ

राज्यात रब्बी हंगामातील प्रसिध्द असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही. तसेच या भागातील पूरग्रस्त, अवकाळी पावसाने नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे भारत भालके यांनी केली.

त्यावर कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Check Also

विविध घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील अनेक भरती घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय (CBI) अधिकाऱ्याचा जम्मूमध्ये अपघाती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *