Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही, राज्यातले युती सरकार हे शब्द पाळणारे… समृद्धीचा दुसरा टप्पा भरवीर ते शिर्डी ८० किमीच्या महामार्गाचे लोकार्पण

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या ५२० किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर या महामार्गाच्या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज करण्यात आले. त्यामुळे आता ६०० किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग नागरिकांसाठी खुला झाला आहे. राज्यातील युती सरकार हे शब्द पाळणारे सरकार असून येत्या डिसेंबरपर्यंत संपूर्ण महामार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होईल असा शब्द मी देतो अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट् समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज करण्यात आले. नाशिक आणि शिर्डी या दोन शहरांना एकमेकांच्या जवळ आणणाऱ्या या महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह याप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सादशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, राज्य पायाभूत सुविधा वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, एमएसआरडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, कैलास शिंदे, संजय यादव, आमदार राम कदम, आमदार प्रा. रमेश बोरनारे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, आणि एमएसआरडीसीचे इतर सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग हा अनेकांना स्वप्नवत वाटत होता मात्र आम्ही हे स्वप्न प्रत्यक्षात आणले. त्यासाठी अनेक अडथळे आले, काही मुद्दाम आणले गेले, मात्र तरीही आम्ही ते स्वप्न पूर्ण केले. जिद्द चिकाटी आणि काही करून दाखवण्याची क्षमता असेल तर काय घडू शकते याचे समृद्धी महामार्ग हे आदर्श उदाहरण असल्याचे यावेळी सांगितले.

तसेच लोकांना पैसे मिळतील की नाही यावर विश्वास नव्हता पण मी स्वतः साक्षीदार म्हणून सही केली आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी सह्या दिल्या. मला विचारतात समृद्धी नक्की कुणाची झाली तर त्यांना मी सांगतो की शेतकऱ्यांची झाली कारण या महामार्गाने त्यांचे आयुष्य समृद्ध झालेच पण त्यासोबत आधी होती त्यापेक्षा जास्त जमीन घेऊन व्यवसाय सुरू करून त्यांनी त्या व्यवसायाला समृद्धी असे नाव दिले. समृद्धी महामार्ग बनताना जे शेतकरी जागा द्यायला तयार नव्हते तेच नवनगरे तयार करताना स्वतःहून आपली जमीन देताहेत हे चित्र बदलण्याचे काम ह्या महामार्गाने केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Check Also

मैदानाची परवानगी बच्चू कडू यांच्याकडे मात्र अमित शाह यांची सभा नवनीत राणांसाठी

सध्याच्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. या त्यातच अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *