Breaking News

Tag Archives: balasaheb thackeray samruddhi expressway

जुलै महिन्यानंतरचा समृध्दी महामार्गावर सर्वात मोठा दुसरा अपघात ६ वर्षाच्या चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार- अपघाताला जबाबदार कोण?

साधारणतः जुलै महिन्याच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर पहाटेच्यावेळी झालेल्या एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसला अपघात होवून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी १४ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पुन्हा समृध्दी महामार्गावर एका टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅव्हलरमधील ६ वर्षाच्या चिमुकलीसह १२ …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही, राज्यातले युती सरकार हे शब्द पाळणारे… समृद्धीचा दुसरा टप्पा भरवीर ते शिर्डी ८० किमीच्या महामार्गाचे लोकार्पण

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या ५२० किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर या महामार्गाच्या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज करण्यात आले. त्यामुळे आता ६०० किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग नागरिकांसाठी खुला झाला आहे. राज्यातील युती सरकार हे शब्द पाळणारे …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य, …और मुझे रास्ते बनाने का समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील उद्घाटनानंतर केले वक्तव्य

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी २६ मे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण येथे झालं. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी आणि कोपरगावातील शेतकऱ्यांचं आभार मानले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचा विकास …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, समृध्दीचा रस्ता चांगलाच, मग विमानही आहेच की… ५२० किमीच्या मार्गासाठी इतका टोल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूरमध्ये झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा आता नागरिकांसाठी खुला करण्यात आला. मात्र, या महामार्गासाठी भरावा लागणारा टोल चर्चेचा …

Read More »

शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला, देशाचे नेतृत्व करतो याचे भान ठेवले पाहिजे ८२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभाला उत्तर देताना दिले लगावला टोला

आज आपण अडचणीच्या काळातून जात आहोत. त्यामध्ये भाजपाचे राज्य आहे. लोकशाहीच्या मार्गाने राज्य आल्यानंतर त्याला विरोध करायचा नसतो. ती समाजहिताची नसतील तर त्याच पध्दतीची भूमिका घ्यायची असते. परंतु राज्यकर्त्यांनी सुध्दा संबंध देशातील प्रांताकडे बघताना आपण देशाचे नेतृत्व करतो याचे भान ठेवले पाहिजे असे खडेबोल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेवर टीका, दिलेलं स्क्रिप्ट फक्त बोलतात.. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे आक्रमक उत्तर द्यावं

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक शब्दांत हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाने जाताय, मग ही टोल दर पाहून जा असे असणार टोल दर

बहुचर्चित बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या महामार्गासाठी नेमका कितीची टोल असणार याबाबत सातत्याने वेगवेगळे दर आकारले जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र,समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधीच अर्थात काल १० डिसेंबर २०२२ रोजी राज्य सरकारकडून टोलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.  तर …

Read More »

उध्दव ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेना प्रत्युत्तर, मीच केलय…अरे नाही बाबा समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनानंतर ठाकरे यांनी केली शिंदेवर टीका

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून मोठा वाद चालू असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक भूमिका मांडली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणतीच भूमिका मांडत नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतरही बसवरा बोम्मईंनी …

Read More »

समृध्दीच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य, प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न.. उध्दव ठाकरे यांचे नाव घेता केली टीका

नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी एक्सप्रेस वेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पास विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधत सूचक विधान केले. त्यामुळे समृध्दी महामार्गावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रकल्पासाठी जमिन दे‌ऊ दिली नसल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी “गोवा-नागपूर” एक्सप्रेस वे ची घोषणा करत “या” चार जणांचे केले कौतुक बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे उद्घाटन प्रसंगी केले कौतुक

बहुचर्चित बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथून १० किमी अंतरावर असलेल्या पहिल्या टोल नाक्यावरील वायफळ येथे झाले. त्यानंतर झालेल्या जाहिर कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोरच पुढील वेळी नागपूर-गोवा एक्सप्रेस वे चा असाच महामार्ग तयार करण्यात येणार असून हा महामार्ग विदर्भ, …

Read More »