Breaking News

जुलै महिन्यानंतरचा समृध्दी महामार्गावर सर्वात मोठा दुसरा अपघात ६ वर्षाच्या चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार- अपघाताला जबाबदार कोण?

साधारणतः जुलै महिन्याच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर पहाटेच्यावेळी झालेल्या एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसला अपघात होवून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी १४ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पुन्हा समृध्दी महामार्गावर एका टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅव्हलरमधील ६ वर्षाच्या चिमुकलीसह १२ प्रवासी जागीच ठार तर २३ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघाताचे वृत्त कळताच नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि भाजपाशासित राज्य असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आर्थिक मदत जाहिर करण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर जुलै महिन्यात झालेल्या भीषण अपघातानंतर राज्यातील विरोधी पक्षांकडून या महामार्गावरील सुरक्षांविषयक दाव्यांबाबत राज्य सरकारने केलेल्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही असे अपघात घडणार नाहीत यादृष्टीने काही गोष्टी नव्याने राबविण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र प्रत्यक्षात खाजगी वाहन चालक आणि वाहनाच्यावतीने प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच उपाययोजना करण्यात आली नसल्याचे या अपघाताच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
बुलढाण्याहून नाशिककडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने जवळपास ३५ प्रवाशी प्रवास करत होते. यामध्ये काही लहान मुलंही होती. नेहमीप्रमाणे रात्रीच्यावेळी निर्मुष्य असलेल्या आणि रस्त्यावर कोणताही थांबा नसलेल्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावरील वैजापूर येथे ही टेम्पो ट्रॅव्हलर प्रवासी वाहतूक गाडी मध्यरात्रीच्या सुमारास याच मार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकला पाठीमागून धडकली.

हे ही वाचा

समृध्दी महामार्गावरील भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू

समृध्दी महामार्गाची पाहणी केल्यावर मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली “ही” घोषणा

त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या ६वर्षाच्या चिमुकलीसह १२ जणांचा मृत्यू तर २३ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान या महामार्गावरील अपघातांची संख्या टाळण्यासाठी काही तज्ञांनी सूचना केल्या होत्या. पण त्या सूचनांचे पालन ना एमएसआरडीसीकडून करण्यात आले ना राज्य सरकारकडून अशीच परिस्थिती राहिली तर समृध्दी महामार्ग हा अपघातांना निमंत्रण देणारा महामार्ग ठरेल अशी भीती या महामार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना श्रध्दांजली वाहत अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रूपये आणि जखमींवर शासकिय खर्चातून उपचार करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या नातेवाईकाना २ लाख रूपयांची आर्थिक मदत जाहिर करत जखमींना ५० हजार रूपयांची मदत जाहिर केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्याचा तपास करण्यात येत आहे.

Check Also

ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ दलित साहित्यिक डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *