Breaking News

पैलवान महेश घुले यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केंद्रीय सांस्कृतिक व खेळा विभागाच्या स्पर्धेसाठी निवड झाली

केंद्रीय सांस्कृतिक व खेळ विभाग यांच्या वतीने अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धांचे आयोजन प्रतिवर्ष प्रमाणे १६ ते १९ ऑक्टोबर या कालावधित त्यागराज स्टेडियम, त्यागराज नगर, दिल्ली येथे करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड चाचणी सचिवालय जिमखाना येथे मानद सचिव कुस्तीगीर संजय पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेले महेश घुले यांनी ७४ किलो वजन गटामध्ये सहभाग घेतला. या ठिकाणी त्यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्य संघामध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

या स्पर्धेमध्ये संपूर्ण देशभरातून विविध राज्यांचे संघ सहभागी होणार आहेत. त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाचा कुस्ती संघ सहभागी होत आहे. महेश घुले हे मागील ६ वर्षापासून राज्य संघाचे, राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहेत. या कामगिरी बद्दल महेश घुले यांचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर साहेब, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील, आनंद भोसले, सुजित डोंगरजाळ, अमर देसाई, सावदेकर, कार्यालयीन अधिक्षक जगदीश कांदे, कर्मचारी संघटनेचे सचिव प्रशांत पवार व इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘व्हॉट्सॲप चॅटबोट’ आणि ‘आई’ महिला केंद्रित धोरण ॲप’मुळे पर्यटनाला गती

व्हॉट्सॲप चॅटबॉट लाँच केल्यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना होईल तसेच ‘आई’ महिला केंद्रित धोरणाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *