Breaking News

उद्धव ठाकरे म्हणाले, केवळ जागा मिळतील म्हणून भाजपा सोबत आला …. गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुले उधळता मग समाजवाद्यांशी बोललो तर कुठे बिघडलं

महाराष्ट्राने मुंबई मिळवली. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीत प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्यासह सर्वजण महाराष्ट्रासाठी एकत्रित आले. त्यावेळी तेव्हाचा जनसंघ आणि आताचा भाजपा कुठे होता. ते तर ना स्वातंत्र्य लढ्यात होते ना महाराष्ट्राला मुंबई मिळावी या लढ्यात होते. पण त्यावेळी होत असलेल्या निवडणूकांमध्ये काही जागा मिळतील म्हणून त्यावेळचा जनसंघ संयुक्त महाराष्ट्र समिती सोबत आला. तेव्हापासून जनसंघ आणि आताचा भाजपा बघितला तर जे मोठे होतायत त्यांच्यासोबत युती करायची आणि दुसऱ्याला मोठं होऊ द्यायचं नाही अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली.

समाजवादी पक्षाबरोबर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे संवाद साधणार होते. त्यावेळी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी समाजवादी पक्षाचे नेते आमदार कपिल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्ये उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी लढा पुकारला. त्या लढ्यात शिवसेना होती, आचार्य आत्रे  समाजवादी होते, कम्युनिस्ट होते. पण त्यावेळचा भाजपा कुठे होता. अर्थात त्यावेळचा जनसंघ कुठे होता. ते फक्त आले निवडणूकीत काही जागा जिंकता येतील का म्हणून सोबत आले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वात आधी शिवसेनेने १९७८ साली हिंदूत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढविली. त्यानंतर १९८७ साली निवडणूक लढविली नाही. तर ती निवडमूक जिंकलीही. त्यानंतर आताच्या भाजपाला हिंदूत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढविता येते असे समजल्यानेच ते आमच्यासोबत आले. मात्र आधीचा जनसंघ आणि आताचा भाजपा पाहिला तर दुसऱ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही हेच त्यांच वागणं आहे. त्यामुळे फक्त फायदा कुठे दिसतो तिकडे फक्त ते जातात असा टोलाही लगावला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, तिकडे गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुले उधळता इकडे मी समाजवाद्यांशी बोलू शकत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी विचारधारा वेगळी असूनही आम्ही सोबत होतो. आणि आता पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत असे सांगत मला मघाशी महात्मा फुले यांची पगडी आणि घोंगड देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी म्हणालो, तुम्ही माझ्या हातात द्या कारण फुल्यांची पगडी नुसती घालायला अडचण नाही पण त्यासाठी डोकं असावं लागतं. नाही तर ती नुसतीच डोक्यावरची टोपी बनते आणि या टोपीखाली दडलंय काय असे प्रश्न पडायला सुरुवात होते असेही सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, वास्तविक पाहता शिवसेनेची युती तोडली ती ते स्वतः मोठं झाल्याचं समजायला लागल्याने. आता त्यांना कोणाची गरज वाटतं नाही. त्यानंतर दुसऱ्याला मोठं होऊ द्यायचं नाही म्हणून त्यांनी शिवसेना फोडली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सत्तेत असताना जे येतात ते येतातच. पण सत्तेत नसताना आणि जवळ काहीही नसताना जे एकत्र येतात ती मैत्री-युती चिरकाळ टीकते आणि शेवट पर्यंत चालते. या वेळेला लढायला सोबत येणारेच टीकतात असे सांगायलाही ठाकरे विसरले नाहीत.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *