राज्यात द काश्मीर फाईल्स चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यास राज्य सरकारने नुकताच नकार दिल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली. या टीकेला उत्तर देताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, आम्ही सिनेमा काढून कधी प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धओक्यात आहे. आम्ही ठाकरे हा चित्रपट बनवला. मात्र तो सुध्दा टॅक्स फ्री केला नसल्याचा उपरोधिक टोला लगावला.
आता त्यांना काश्मीर आठवले आहे. मोदी म्हणाल्यानुसार आम्ही पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात येतोय, त्याची वाट पहात आहोत. कश्मीरी पंडितांना शस्त्र द्या, असे बाळासाहेब परखडपणे म्हणाले होते. मात्र, आम्ही कधी सिनेमा काढून प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे. विरोधकांनी त्या चित्रपटावरून राजकारण करू नये असा सल्लाही दिली.
दहशतवादी अमरनाथ यात्रेत धमकी देत होते. तेव्हा केंद्र सरकार कुठे होते. बाळासाहेब पहिले नेते होते, त्यांनी असा इशारा दिला की, तेव्हा कोणाच्या केसालाही धक्का लागला, तर तुमचे विमान साधे हजपर्यंत उडणार नाही, अशी धमकी दिली. द काश्मीर फाइल्स चित्रपट कसा बनला, याबाबत मला सगळी माहिती आहे.
संजय राऊत म्हणाले की, मी कोणाची वकिली केली नाही. आम्ही अनेक वेळा अमन आणि शांतीसाठी कश्मीरमध्ये गेलो. आम्ही टुरिस्ट म्हणून गेलो नाही. खरे तर बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मीरसाठी जे केले ते कोणीच केले नाही. मोदी पाक व्याप्त कश्मीर करू म्हणाले होते. ते पाहावे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
२०१४ मध्ये घर वापसीची घोषणा दिली होती. तेव्हा आम्ही समर्थन दिले. ३४० बाबत देखील समर्थन दिले होते अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
भाजपा आमदारांनी द कश्मीर फाईल्स हा चित्रपट कर मुक्त करण्याची मागणी करत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात लावून धरली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विधानसभेत भाजपची कोंडी करत मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करून दिली. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कश्मीर फाइल्स’ सिनेमाचा उल्लेख केला. केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला, तर संपूर्ण देशालाच लागू होईल. अगदी जम्मू – काश्मीर ते कन्याकुमारीपर्यत करमुक्त होईल असा उपरोधिक टोला भाजपासह पंतप्रधान मोदींना लगावला.
