Breaking News

मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी लिहिले उपराष्ट्रपतींना पत्र मविआला पाडण्यासाठी माझ्यावर दबाव, मुलीच्या लग्नातील फुल- डेकोरेटवाल्यावरही दबाव

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला काही लोकं मध्यंतरी भेटले. तसेच त्यांच्या कटात सहभागी होण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. जर त्यांच्या कटात सहभागी झालो नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावून तुरूंगात टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट करत त्या अनुषंगाने आपण उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिध्द सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहील्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली. नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील गौप्यस्फोट केला.

मागील काही दिवसांपासून भाजपाचे काही नेते मला सातत्याने म्हणत आहेत की, तुम्हालाही सध्या अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शेजारच्या कोठडीत जावे लागणार आहे. त्यावर तुमची इच्छाच असेल तर आम्ही तुरूंगात जावू परंतु गेल्यानंतर तुम्हालाही तुरुंगात आणल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा त्यांनी यावेळी भाजपा नेत्यांना दिला.

सध्या माझ्या मुलीच्या लग्नात केलेल्या खर्चाचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पुढे येत असून लग्नासाठी पुरवठा केलेल्या फुलवाल्याला आणि स्टेज डेकोरेशन वाल्याला बोलावून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. यातील फुलवाल्याला तर किती पैसे दिले ते सांग म्हणून धमक्या देण्यात आल्या. त्यावर त्या फुलवाल्याने मी ती फुले मोफत दिल्याचे ईडी अधिकाऱ्यांना सांगत त्याबदल्यात पैसे घेतले नसल्याचे सांगितले. तेव्हा ते ईडीचे अधिकारी त्याच्यावर खोटे केसेसे टाकण्याची धमकी देत असल्याचे त्यांनी सांगितले.

ईडीच्या कार्यालयात कोणालाही परवानगी नसते. परंतु काही जण ईडीच्या ऑफीसमध्ये दररोज जावून बसत असून ते लोकंच कोणावर धाड टाकायची, कोणावर नाही हे अधिकाऱ्यांना आदेश देतात. याशिवाय हेच लोक दबाव तंत्राचा वापर करतात असा आरोप करत ते कोण लोक आहेत याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी त्यांच्याकडून कितीही दबाव आला कितीही धमक्या आल्या तरी राज्यातले सरकार पडणार नाही आणि पडूही देणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

या ईडीची चौकशी मुंबई पोलिसांनी करावी अशी मागणी करत मुंबईतला गुंड कोण आहे? तर शिवसेना आहे. त्यामुळे मी शिवसैनिक असून मी कोणाला घाबरत नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेले हेच ते पत्र:-

Check Also

कोलकाता पोलिसांनी मागितले राजभवनाचे सीसीटीव्ही फुटेज

कोलकाता पोलिसांच्या चौकशी पथकाने एका महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छेडछाडीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्यपाल सी.व्ही. आनंदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *