Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राहुल गांधी यांच्यावर “मुर्खों के सरदार ” म्हणून टीका

मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणूकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचाराच्या निमित्ताने भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सातत्याने प्रचारसभा घेत आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, प्रियंका गांधी वड्रा यांच्या प्रचारसभा होत आहेत. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील बैतुल येथील जाहिर प्रचारसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता “मुर्खों के सरदार ” अशी टीका केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मध्य प्रदेशात जाहिर सभा झाली. त्या प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आपल्या सर्वांकडे मोबाईल फोन आहेत. त्या मोबाईल फोनच्या मागील बाजूस लिहिलेले असते की मेड इन चायना. आपण घेतलेल्या शर्टच्या बटनवर, शर्टाच्या कॉलरच्या खाली आणि बुट जरी घेतला तरी त्याच्या खाली मेड इन चायना लिहिलेले असते.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, पण तुम्ही कधी पाह्यलं आहे का, की मोबाईल फोनच्या मागे मेड इन मध्य प्रदेश लिहिलेले असा सवाल उपस्थित जनसमुदायाला केला. आम्हाला अशा गोष्टी करायच्या आहेत असेही स्पष्ट केले.

राहुल गांधी यांच्या याच वाक्याचा धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैतुल येथील जाहिर प्रचारसभेत बोलताना म्हणाले, काँग्रेसचे एक महाज्ञानी पुरूष सांग होते. तुमच्या सगळ्यांकडे चीनचे फोन असायला हवेत. पण त्यांना देशातील व्यक्तींनी केलेली विकास कामे दिसत नाहीत. ते मुर्खांचे सरदार असून त्यांनी कोणत्या विदेशी रंगाचा चश्मा घातला आहे, हेच कळत नाही. त्यांना देशाची प्रगती न बघण्याची मानसिक आजार झाल्याची टीकाही राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना फक्त २० हजार कोटींचे फोन बनत होते. आता आपल्या देशात ३.५ लाख कोटी रूपयांचे फोन तयार होत असून जगातील दुसऱ्या क्रमांकाचे फोनचा निर्यातदार आणि जगात नाव असल्याचा दावा केला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *