Breaking News

महादेव अॅप प्रकरणी डाबर कंपनीच्या चेअरमनसह ३२ जणांवर मुंबईत गुन्हे दाखल छत्तीसगडमधील निवडणूकीतील आरोप-प्रत्यारोपांचे पडसादः मुंबई पोलिसांनी केली कारवाई

छत्तीसगड मध्ये सध्या विधानसभा निवडणूकांत काँग्रेस विरूध्द भाजपा असा सामाना दिवाळीतही चांगलाच रंगलेला असताना भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील प्रचार सभेत काँग्रेस मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना महादेव बेटींग अॅपकडून ५०० कोटी रूपये देण्यात आल्याचा आरोप करत तसा व्हिडिओही व्हायरल केला होता. त्यावरून काँग्रेसनेही एक भूपेश बघेल यांचाच एक व्हिडिओ जारी करत महादेव अॅपवर बंदी घालावी यासाठी सर्वात आधी आपणच मागणी केली होती असा दावा केला. आता छत्तीसगडमध्ये मतदानाचा दिवस जवळ येत असतानाच महादेव बेटींग अॅप प्रकरणी मुंबई पोलिसांनी डाबर कंपनीच्या चेअरमनसह १८ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

छत्तीसगडच्या विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान भाजपाकडून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा तो वादग्रस्त व्हिडिओ जारी केला. त्यानंतर काँग्रेसनेही मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या मुलाचा ५०० कोटी रूपयांच्या डिलिंगचा व्हिडिओ काँग्रेसकडून जारी करण्यात आला. या दोन्ही व्हिडिओतील तथ्य आणखी सिध्द व्हायचे आहेत. मात्र मुंबईत महादेव बेटींग अॅपशी संबधित असल्याच्या संशयावरून डाबर कंपनीचे चेअरमन मोहित बर्मन यांच्यासह १८ जणांना अटक केली आहे. तसेच या महादेव ऑनलाईन बेटींग अॅपच्या माध्यमातून १५ हजार कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पुढे येत आहे.

मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत डाबर ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन गौरव बर्मन, डाबरचे चेअरमन मोहीत बर्मन आणि बॉलिवूड अभिनेता साहिल खान यांच्यासह ३२ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मोहित बर्मन यांचे नाव आरोपींच्या यादीत १६ नंबरवर तर गौरव बर्मन यांचे नाव १८ व्या नंबरवर असून या सर्वांच्या विरोधात माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे वृत्त द हिंदू या संकेतस्थळाने दिले आहे. डाबरच्या दोन्ही चेअरमनच्या विरोधात भारतीय दंड संहिता, जुगार विरोधी कायदा आणि आयटी अॅक्ट खाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्त्ये प्रकाश बनकर यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

तर बॉलिवूड अभिनेता साहिल खान याचे आरोपींच्या यादीत २६ व्या ठिकाणी असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच महादेव अॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा कमावित होता असा दावा करण्यात येत आहे.

प्रकाश बनकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, महादेव अॅपच्या माध्यामातून अनेक जणांनी १५ हजार कोटींचा आर्थिक घोटाळा केला आहे. तसेच डाबरचे चेअरमन मोहित बर्मन हे मॅच फिक्सिंग करण्यातही पुढाकार घेत होते. याशिवाय आयपीएलमधील एका टीमचे समभागही मोहित बर्मन यांनी खरेदी केले होते असा आरोप केला.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून अॅपचे प्रमोटर, सौरभ चंद्रकार, रवी उप्पल, शुभम सोनी यांचा तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच हे बेटींग अॅप २०१९ पासून सुरु होते. तेव्हापासूनचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरु केले असल्याचे सांगितले.

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *