Breaking News

संजय राऊतांच्या वक्तव्यावर राज म्हणाले, मी लवंड्यावर… पुण्यातील पत्रकार परिषदेत दिले उत्तर

मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसेला उपरोधिक टोला लगावत भाजपा आपले काम नव एमआयएम आणि नवं हिंदूत्वावादी ओवेसीच्या माध्यमातून करून घेत असून या निमित्ताने महाराष्ट्रात दंगली घडवून आणण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप केला.

यासंदर्भात सध्या पुणे दौऱ्यावर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला अशा लवंड्यांवर मी बोलत नाही असा खोचक टोला लगावत संजय राऊत यांना लागवत पण जेव्हा योग्य वेळी येईल त्यावेळी मी बोलेन असे स्पष्ट करत अधिक बोलण्याचे टाळले.

राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या विरोधातील भूमिकेवरून आधीच राज्याचे राजकिय वातावरण तापलेले असतानाच काल राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचे पठण करत महाआरती केली. त्यानंतरही त्यांच्या या भूमिकेवरून पुन्हा एकदा त्यांच्यावर राजकिय वर्तुळातून टीकेचा भडीमार सुरु झाला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी आगामी ५ जूनचा अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा करत १ मे या महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहिर सभा घेणार असल्याची घोषणा केली. याशिवाय भोंग्याचा प्रश्न हा राजकिय नाही तर सामाजिक असल्याचे आपण यापूर्वीच स्पष्ट केलेले असून या विषयाकडे त्याच नजरेने पहावे असे आवाहनही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

काही वेळापूर्वी एक मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगांवकर यांना भेटून त्याच्या घरी लहान मुलं असल्याने भोंग्याचा आवाज कमी ठेवा म्हणून मस्जिदीत जावून सांगितल्याची घटना निदर्शनास आणून दिली. त्यामुळे भोंग्याचा त्रास हा फक्त हिंदूनाच नाही तर मुस्लिम समुदायालाही होतोय. त्यामुळे याकडे त्याच नजरेतून बघा असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

बाळासाहेब थोरात म्हणाले, २४ तासात भाजपाचे तीन नेते राज यांना भेटले यावरून संकेत स्पष्ट… पूर्वीचे लाव रे व्हिडीओ म्हणणारे राज ठाकरे खरे होते

जवळपास एक वर्षापासून भाजपा आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या ज‌वळकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपाची युती …

Leave a Reply

Your email address will not be published.