Breaking News

गोबेल्स नीतीला मारक अशी संघटना आपल्याला तयार करायचीय देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जातय त्यामुळे तरुणांमध्ये अस्थिरता-जयंत पाटील

देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे. त्यांना फुले – शाहू – आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याची दिशा आपल्याला द्यावी लागेल. यासाठी वैचारिक बैठका घ्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाई येथे केले.

सध्या देशात गोबेल्स नीती अवलंबिली जात आहे. खोट्याला खरं ठरवण्याचा खटाटोप सुरू आहे. या गोबेल्स नीतीला मारक अशी संघटना आपल्याला तयार करायची आहे. आज पेट्रोल – डिझेल, सिलेंडरचे भाव वाढले आहेत, ही खरी गोष्ट लोकांना जावून सांगा असेही ते म्हणाले.

पक्षाची एक योग्य रचना आपल्याला करायची आहे, ही रचना येत्या काळात तुम्ही कराल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वाई – खंडाळा – महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.

गडचिरोली जिल्ह्यापासून सुरू झालेला हा दौरा उद्याच्या २३ तारखेला कोल्हापूरात संपणार आहे. आपली संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, संघटनेला एक भूमिका देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरलो आणि आज वाईत पोहोचलो आहे. आपल्या पक्षाची बैठक व्यापक केली पाहिजे. संघटना व्यापक झाली पाहिजे. सर्व समाजातील, सर्व गावातील लोकांना एकत्र करून आपल्या संघटनेत घ्या असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेची बांधणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही यात्रा निघाली आहे. पवार साहेबांचा विचार शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते काम करत आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून लोकांच्या मनात घर बनवण्याचे काम आम्ही सर्व करत आहोत. पक्ष.वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जे आदेश देतील, जो कार्यक्रम देईल त्यांची पूर्तता करण्याचे काम आम्ही करू असे आश्वासन आमदार मकरंद पाटील यांनी दिले.

संवादाने माणसांचे बळ वाढते, समन्वय साधण्यासाठी संवाद साधण्याची गरज असते आणि समन्वयाने आपल्याला ही संघटना वाढवायची आहे म्हणून ही राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.

लोकांच्या सुखदुःखात आपण जर सहभागी झालो की लोकं आपोआप आपल्याशी जोडले जातात. हेच काम आपल्याला करायचे आहे. आपली संघटना वाढवण्यासाठी मोठी मदत होईल असेही खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, आयटी सेलचे प्रमुख सारंग पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, युवती जिल्हाध्यक्षा पुजा काळे, तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा युवक तालुकाध्यक्ष अजय भोसले, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, वाई युवक तालुकाध्यक्ष समाधान कदम, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष बाबुराव सपकाळ, खंडाळा तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांची मागणी; अनाचार्य भोसले, दवे, नितेश राणेंचीच एसआयटी चौकशी करा त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा कुटिल डाव गावकऱ्यांनी उधळून लावला

महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटना करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *