Breaking News

महाराष्ट्र प्रदेशची काँग्रेसची कार्यकारणी आणि १४ जिल्हा व ग्रामीणचे अध्यक्ष अखेर जाहीर १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सचिव, ६ प्रवक्ते कायम

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसची कार्यकारणीत कोणा कोणाचा समावेश होणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यानुसार आज काँग्रेसच्या केंद्रीय समितीने महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेस कार्यकारणीतील नावांना मंजूरी दिली असून यासंबधीची यादीही जाहीर केली.

या कार्यकारणीत १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सचिव, १ खजिनदार आदींसह कार्यकारणी सदस्य आणि १४ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारणीवर जवळपास सर्वच गटाच्या नेते-कार्यकर्त्यांना प्राधान्य देत काँग्रेसमध्ये कोणताही गट नाराज राहणार नाही याची काळजी काँग्रेस श्रेष्ठींनी घेतल्याचे उपलब्ध यादीवरून दिसत आहे. मुंबईतील स्व.गुरूदास कामत गटाचे डॉ.अमरजीत मनहास यांना राज्याच्या खजिनदार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर याच गटाचे झाकिर अहमद यांचा समावेश जनरल सेक्रेटरी पदी वर्णी लावण्यात आली आहे.

ठाणे ग्रामीणच्या अध्यक्षपदी दयानंद चोरगे, भिवंडीच्या शहराध्यक्ष पदी रशिद मोमीन, रायगडच्या अध्यक्षपदी महेंद्र घरत, उल्हासनगरच्या अध्यक्ष पदी रोहित साळवे, सोलापूर ग्रामीणच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नुकतेच काँग्रेसमध्ये आलेले माजी खासदार स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव धवलसिंग मोहिते-पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सांगली ग्रामीणच्या अध्यक्षपदी विक्रमसिंह सावंत, जळगांव शहर अध्यक्ष पदी श्यामकांत तायडे, वाशिम अध्यक्ष पदी अमित झनक, अकोला ग्रामीणच्या अध्यक्षपदी अशोक अमनकर, बीडच्या अध्यक्ष पदी राजेसाहेब देशमुख, बुलढाण्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार राहुल बोंद्रे यांच्याकडे, पुणे शहराच्या अध्यक्ष पदी रमेश बागवे यांच्याकडे, मीरा भाईंदरच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रमोद सामंत आणि सिंधुदूर्ग अध्यक्ष पदी चंद्रकांत गावडे यांची निवड करण्यात आली आहे.

तर प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्ते पदी अनंत गाडगीळ, राजू वाघमारे, सचिन सावंत, अतुल लोंढे, डॉ.संजय लाखे-पाटील, उत्कर्ष रूपये यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे.

प्रदेश कार्यकारणीवर निवड झालेल्यांची यादी खालील प्रमाणे:-

Check Also

राज्यसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्या सारखं… शिवसेनेला लगावला टोला

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या उमेदवारानं बाजी मारल्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published.