Breaking News

आदिवासी बिर्‍हाड मोर्चेकऱ्यांचा प्रश्‍न थेट विधानसभेत … देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, कष्टकरी,बांधवाच्या विविध मागण्या आणि दुष्काळ जाहिर करावा या मागणीसाठी निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाचा आवाज धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत बुलंद केला. आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी,कष्टकर्‍याच्या मागण्यांचा एल्गार विधानसभेत पुकारला. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा बिर्‍हाड मोर्चा मुंबईत धडकण्याआधीच शासनाने मध्यस्थी करुन शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत केली.

दरम्यान कुणाल पाटील यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी मोर्चातील पदाधिकार्‍यांशी शासन पुन्हा चर्चा करणार असे आश्‍वासन दिले.

आदिवसाी शेतकरी कष्टकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा नंदुरबार-धुळे-मुंबई बिर्‍हाड मोर्चा निघाला आहे. ४३२ कि.मी.पायपीट करीत १२ दिवसात हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. या बिर्‍हाड मोर्च्यात तब्बल दहा हजार आदिवासी शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चातील शिष्टमंडळ आपल्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी नागपूर येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटायला नागपूर येथे आले, आदिवासी मंत्र्यांनी केवळ दहा पंधरा मिनटे चर्चा केली. त्यामुळे या शिष्टमंडळाची घोर निराशा झाली. आदिवासी,कष्टकरी बांधवाच्या विविध मागण्यांसाठी निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाचा आवाज आज पुन्हा एकदा आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत उठवित एल्गार पुकारल्याने शेतकरी कष्टकर्‍यांचा आवाज बुलंद झाला. आज १५ डिसेंबर रोजी दुपारी नागपूर हिवाळी अधिवेशनात अति तातडीचा मुद्दा मांडतांना आ.कुणाल पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच सवाल विचारला.

अधिवेनशनात बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी आदिवासी शेतकरी व कष्टकर्‍यांचा प्रश्‍न पोटतिडीकीने मांडत त्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी केली. हा मोर्चा मंत्रालयावर धडकण्या आधीच मागण्या मान्य कराव्या अशी मागणी केली.

कुणाल पाटील यांनी बिर्‍हाड मोर्चाच्या मागण्या विधानसभेत मांडतांना सांगितले कि, नंदुरबार,धुळे,नाशिक जिल्हा पूर्णपणे दुष्काळ जाहिर करावा. अतिवृष्टी, गारपीठ,नैसर्गिक आपत्ती,दुष्काळात नुकसान झालेल्या वनहक्क दावेदार आदिवासीसह सर्व शेतकर्‍यांना एकरी ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, दुष्काळी उपाययोजना म्हणून पिण्याच्या पाण्याची व रोजगाराची व्यवस्था करावी, साक्री तालुक्यातील २०१८ मधील दुष्काळाची शेतकरी व वनहक्क दावेदारांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी. आदिवासी व इतर जंगलनिवासी वनहक्क कायदा २००६ची अंमलबजावणी करुन दावेदारांना हक्काचा सातबारा उतारा द्यावा अशा विविध मागण्या घेवून हा मोर्चा निघालेला आहे. त्यामुळे मोर्चा मुंबईत पोहचण्या आधीच शासनाने मध्यस्थी करुन आदिवासी बांधव, शेतकरी, कष्टकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाच्या मागण्या आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत सांगितले कि, बिर्‍हाड मोर्चाबाबत शासनाने दखल घेतली असून गिरीष महाजन आणि गावीत यांनी मोर्चातील पदाधिकार्‍यांशी चर्चाही केलेली आहे. तरीही शासन लवकरच त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढेल असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात दिले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *