Breaking News

Tag Archives: girish mahajan

एकनाथ खडसे यांची अवस्था ना घर…, महाजनांच्या त्या वक्तव्यामुळे शिक्कामोर्तब ?

राज्यातील भाजपाचे जूने वरिष्ठ नेते तथा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे हे एकेकाळचे राज्याच्या राजकारणातील वजनदार नेते. परंतु भाजपात असताना राज्यातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुप्त संघर्ष सुरु झाला अन त्यात त्यांना मंत्रिपदाची खुर्ची सुरवातीला सोडावी लागली. त्यानंतर भाजपाही सोडावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी शरद …

Read More »

एमटीडीसी’चा ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित

पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाची दखल घेऊन प्रतिष्ठित स्कोच (SKOCH)च्या रौप्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे हा पुरस्कार सोहळा झाला. ‘एमटीडीसी’च्या अधिकारी मानसी कोठारे यांनी हा पुरस्कार …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे

पोलीस दलात भरती होतांना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी शासक म्हणून नाही तर जनतेचे सेवक म्हणून आपले कर्तव्य निभवावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ च्या समारोप समारंभाप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास व …

Read More »

आनंद महिंद्रा यांचे आश्वासन, पुढील वर्षी अधिक लोकप्रिय उपक्रम राबवणार

मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद मंहिद्रा यांनी पुढील वर्षीपासून लोकप्रिय उपक्रम राबविणार असल्याचे आश्वासन देत मुंबई फेस्टीवलमधील कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. गेले आठ दिवस सुरू असलेला मुंबई फेस्टिवल २०२४ चा आज समारोप होत आहे. एक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि ती रेस आज संपली आहे असे वाटत आहे. …

Read More »

विभाजनानंतर नव्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर

खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या १,०२१ मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेली नाहीत, अशा नवीन महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती …

Read More »

वांद्र्यांत ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे उद्घाटन, ५१३ स्टॉलचा समावेश

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी. म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘महालक्ष्मी सरस’च्या माध्यमातून २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादनांची विक्री होईल, असा विश्वास व्यक्त करीत ८ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असलेल्या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश …

Read More »

मनोज जरांगे पाटील अडले सोयऱ्यावर तर गिरिष महाजन म्हणाले देता येणार नाही

मराठवाड्यासह राज्यातील मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याच्या प्रश्नी सध्या राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात अल्टीमेटम आणि टीकणारं आरक्षणाच्या शब्दावरून खेळ सुरु आहे. राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंतची अंतिम तारीख दिली आहे. मात्र राज्य सरकारकडून आणखी वेळ मागण्यात येत आहे. मनोज जरांगे …

Read More »

सुधाकर बडगुजर म्हणाले, व्हिडीओ मॉर्फ.., सुषमा अंधारे यांचा प्रत्यारोप, त्या पार्टीत भाजपा नेतेही…

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्क प्रमुख सुधाकर बडगुजर आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत पार्टी करतानाचे फोटोग्राफ सादर करत शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधण्याचा आरोप केला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत त्या …

Read More »

आदिवासी बिर्‍हाड मोर्चेकऱ्यांचा प्रश्‍न थेट विधानसभेत … देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, कष्टकरी,बांधवाच्या विविध मागण्या आणि दुष्काळ जाहिर करावा या मागणीसाठी निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाचा आवाज धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत बुलंद केला. आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी,कष्टकर्‍याच्या मागण्यांचा एल्गार विधानसभेत पुकारला. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा बिर्‍हाड मोर्चा मुंबईत धडकण्याआधीच शासनाने मध्यस्थी करुन …

Read More »

एकनाथ खडसे यांचे खुले आव्हान, भरचौकात मला जोड्याने मारा नाही तर मी तुम्हाला.. गिरीष महाजन यांच्या टीकेवरून खडसे यांनी दिले आव्हान

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच शरद पवार गटाचे आमदान एकनाथ खडसे यांना जळगावात हृदयविकाराचा त्रास सुरु झाल्याची माहिती पुढे आली. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी एकनाथ खडसे यांचे प्राण वाचावे आणि त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत या उद्देशाने एअर अॅब्युलन्सची उपलब्ध करून दिली. त्यानंतर भाजपाचे आमदार तथा मंत्री गिरिष …

Read More »