Breaking News

Tag Archives: girish mahajan

तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केली. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व …

Read More »

गिरिष महाजन म्हणाले, खरं तर बोगस डॉक्टरांना आपणच अलाऊन्स देतोय फक्त त्यांना दररोज पाचशेचा दंड ठोठावतो, कायदा बदल्याची आवश्यकता

मागील काही वर्षांमध्ये राज्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढत आहे. यासंदर्भातील प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बन्सोड यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरिष महाजन म्हणाले, खरे तर आपण बोगस डॉक्टरांना आपणच अलॉऊन्स देतोय असे सांगत या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या एका निर्णयामुळे असल्याचे स्पष्टीकरण दिले. विधानसभेचे …

Read More »

ग्रामविकास विभागातील पदे तत्काळ भरणार -ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची विधानसभेत माहिती

ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी ग्रामविकास विभागातील १३ हजार ४०० पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तत्काळ ही पदे भरली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हंगरगा व दापका या दोन गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी …

Read More »

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारीपासून प्रारंभ क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन

महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून सुरूवात होणार आहे. क्रीडा प्रकारानुसार राज्यातील निवडक शहरांच्या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांकरिता खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी …

Read More »

महाराष्ट्रातही आता रंगणार फुलबॉलचा खेळः जर्मनीबरोबर केला करार जी- 20 देशांतील सहकार्य वाढीच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल-क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन

राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला . हा होणारा सामंजस्य करार  जी 20 देशांतील सहकार्य वाढीच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. आज मंत्रालयात क्रीडा व युवक …

Read More »

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरणार

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरण्यात येणार आहे. सदर पदभरती प्रक्रिया टी.सी. एस. आयओएन या कंपनीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील पदे १०० टक्के प्रमाणात भरण्यास ५ मे २०२१ रोजी मान्यता देण्यात आली आहे. …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २०२२ नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय शुभारंभ

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात २० नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान २०२२-२३’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले, राजकियदृष्ट्या संपविण्यासाठीच भूखंड प्रकरण

भोसरी भूखंड प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत पुणे न्यायालयाने संशय व्यक्त करत एकनाथ खडसे यांना अटक करण्यापासून मज्जाव केला. तसेच नव्याने फेर चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताई नगर येथे पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांचे नाव न …

Read More »

सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपाचा तो फुसका बार काही केल्या वाजत नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छावरून भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यातील मंत्री गिरीष महाजन यांनी वक्तव्य करत शिवसेनेतील आणखी काही नेते आणि आमदार शिंदे गटात येणार असल्याचे वक्तव्य केले. त्यावर शिवसेनेच्या उपनेत्या …

Read More »

शिंदे गटाच्या आमदारांची मंजूर कामे भाजपाच्या मंत्र्याने रद्द केल्याने धुसफुस शिंदे फडणवीस सरकारमध्ये अंतर्गत धुसफुस वाढली

राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गट आणि भाजपाचे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. मंत्रिमंडळाचा विस्तार होताच शिंदे गटाच्या अनेक आमदारांमध्ये मंत्री पदावरून तर पालकमंत्री पदावरून तर आपला मूळ मतदार संघ बदल्यावरून नाराजी नाट्य रंगू लागले असताना आता या सरकारमध्ये विकास कामं रद्द करण्यावरून पुन्हा एकदा अंतर्गत …

Read More »