Breaking News

सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपाचा तो फुसका बार काही केल्या वाजत नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छावरून भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यातील मंत्री गिरीष महाजन यांनी वक्तव्य करत शिवसेनेतील आणखी काही नेते आणि आमदार शिंदे गटात येणार असल्याचे वक्तव्य केले. त्यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, दिवाळी असल्याने काही लवंगी मिर्चा तडतड करत आहेत. नार्वेकर शिंदे गटात जाणार हा फुसका बार भाजपाने सोडला आहे. तो बार काही केल्या वाजत नाही असा खोचक टोलाही लगावला.

अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे सातत्याने अमित शाह यांच्यावर टीका करत आहे. त्यात नार्वेकर यांनी अमित शाह ट्विटरवरून वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावरून गिरीश महाजन यांनी नार्वेकर नाराज असल्याचं मी सुद्धा ऐकलं असल्याचं म्हटलं.

सुषमा अंधारे म्हणाल्या, दिवाळी असल्याने काही लवंगी मिर्चा तडतड करत आहेत. नार्वेकर शिंदे गटात जाणार हा फुसका बार भाजपाने सोडला आहे. तो बार काही केल्या वाजत नाही, असा टोला लगावला.

त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका करत ‘मातोश्री’पुरत त्यांचं राजकारण असल्याचं म्हटले. नारायण राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, मातोश्रीत असलेल्या तीर्थरुप ठाकरेंनी कुवत नसताना तुम्हाला मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. अन्यथा तुम्ही कणकवली लिमीटेड कंपनीपर्यत मर्यादित राहिले असता, अशा शब्दांत राणेंवर टीका केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जावून भेट घेतली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही नार्वेकर हे विधिमंडळात येवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्र्यांना भेटल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची तयारी नार्वेकर यांनी पार पडत स्वत: उपस्थित राहीले. त्यामुळे ही चर्चा बंद झाली. परंतु अमित शाह यांना आज ट्विटरवरून शुभेच्छा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात झाली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *