Breaking News

मनोज जरांगे पाटील अडले सोयऱ्यावर तर गिरिष महाजन म्हणाले देता येणार नाही

मराठवाड्यासह राज्यातील मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याच्या प्रश्नी सध्या राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात अल्टीमेटम आणि टीकणारं आरक्षणाच्या शब्दावरून खेळ सुरु आहे. राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंतची अंतिम तारीख दिली आहे. मात्र राज्य सरकारकडून आणखी वेळ मागण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारचे शिष्टमंडळ अर्थात उद्योग मंत्री उदय सामंत आणि ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन हे चर्चेसाठी पोहोचले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने लिहून दिल्याप्रमाणे सरसकट आरक्षण देणार असल्याची आठवण करून देत आमच्या सग्या-सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी केली.

त्यावर मंत्री गिरिष महाजन म्हणाले, आईला, मुलगा आणि त्याच्या मुलाला व रक्त नात्यातील व्यक्तींनाही आरक्षण मिळणार असल्याचे सांगत पत्नीला, तीच्या भावाला , सासऱ्यांना आरक्षणाचा लाभ देता येणार नाही. तसेच रक्तसंबधात पत्नी आणि तिच्या घरचे येत नसल्याचेही स्पष्ट केले.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले, राज्य सरकारने सरसकट आरक्षण देण्याचे मान्य केलेले असताना आता सोयऱ्यांना मात्र सरकार देत नाही म्हणून सांगितले जात असल्याचेही चर्चे दरम्यान सांगितले.

यावेळी गिरिष महाजन म्हणाले, मराठा समाजाला टीकणारे आरक्षण द्यायचे असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरचा हट्ट धरू नये असे स्पष्ट केले. तसेच मुंबईत आल्यास सर्वच गोष्टींवर चर्चा होईल असेही सांगितले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *