Breaking News

एकनाथ खडसे यांचे खुले आव्हान, भरचौकात मला जोड्याने मारा नाही तर मी तुम्हाला.. गिरीष महाजन यांच्या टीकेवरून खडसे यांनी दिले आव्हान

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच शरद पवार गटाचे आमदान एकनाथ खडसे यांना जळगावात हृदयविकाराचा त्रास सुरु झाल्याची माहिती पुढे आली. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी एकनाथ खडसे यांचे प्राण वाचावे आणि त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत या उद्देशाने एअर अॅब्युलन्सची उपलब्ध करून दिली. त्यानंतर भाजपाचे आमदार तथा मंत्री गिरिष महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आजारपणावरून निशाणा साधला. खडसे हे सगळं सहानुभूती मिळविण्यासाठी करत असल्याचा आरोप केला. त्यास एकनाथ खडसे यांनी आज प्रत्युत्तर दिले.

एकनाथ खडसे यांनी आज स्वतःचा एक व्हिडिओ ट्विट करत मंत्री गिरिष महाजन यांना थेट खुले आव्हानच दिले. तसेच हे आव्हान देताना थेट जोडे मारण्याची आणि खाण्याची निर्वाणीचा इशारा दिला.

एकनाथ खडसे या व्हिडिओत म्हणाले की, गिरिष महाजन यांचे वय आता साठी बुध्दी नाठी झालेली आहे. तसेच ते वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून करत होते. मात्र त्यांचे लक्ष हृदयरोगाकडे जरा कमी लक्ष होते. त्यांनी जर लक्ष दिले असते तर हृदयरोग काय असतो हे कळले असते.

पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, माझं हृदय बंद पडले होते. ते हृदय जर बंद पडलेले हृदय सुरु करण्यासाठी तातडीने सुरु करण्यासाठी मला अत्याधुनिक उपचाराची गरज होती. यासंदर्भात माझ्याकडे असलेली कागदपत्रे त्यांनी बघितली तर त्यांना समजेल पण त्यांनी ती कागदपत्रे न पाहिली नसतानाच माझ्यावर हे सगळं सहाभूती मिळविण्यासाठी हे करत असल्याचा आरोप गिरिष महाजन यांनी केला.

गिरिष महाजन यांच्या आरोपावर एकनाथ खडसे यांनी खुले आव्हान देत म्हणाले, गिरिष महाजन यांनी माझ्याकडील कागदपत्रे तपासावीत. ती कागदपत्रे जर खोटी निघाली तर भरचौकात मला जोडे मारावे अन्यथा भरचौकात मी तुम्हाला जोडे खावीत असे खुले आव्हान महाजन दिले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *