Breaking News

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय?

जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी वाढता पाठिंबा पाहून पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला. या प्रकरणावरून राजकिय वादंग पेटलेले असताना मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांची बदली करण्यात आली. तसेच त्यांची बदली पुण्यात करण्यात आली. मात्र या बदलीवरून शिंदे सरकारचेच मंत्री दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवित तुषार दोषी यांच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली. यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा सांगत महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललय असा सवाल ट्विट करत उपस्थित केला.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले, या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले, हा सस्पेन्स अजूनही सुटलेला नाही.

तसेच पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, त्या पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की ओढवली. लाठीमारानंतर जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या नावाखाली त्यांना पुण्यात ‘क्रिम पोस्ट’वर बदली मिळाली असा खोचक टोलाही लगावला.

तुषार दोषी यांच्या बदलीवरून विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठा आंदोलकांवर झालेल्या दडपशाहीसाठी त्यांना गृहखात्याने नेमकी शिक्षा दिली की प्रमोशन अशी चर्चा सुरू असताना आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती द्या अशी मागणी करत आहेत असेही सांगितले.

महायुतीतील विसंवादावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, विशेष म्हणजे राज्य सरकारच्या कामकाजाबाबतची माहिती पत्रांवर पत्रे लिहिल्यानंतर मिळत नाही, केसरकरांचे हे पत्र मात्र लगेच सार्वजनिक होते. हा सारा प्रकार म्हणजे एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसर्‍याने रडल्यासारखे करायचे, असाच आहे. महायुतीचे सरकार हे जनतेला मूर्ख बनवू पाहणारे हेराफेरी सरकार आहे असा आरोपही केला.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *