Breaking News

कोविड काळातील ४ हजार कोटींचा खर्चाचा तपशील मुंबई पालिकेकडे नाहीच

मुंबईतील एका कार्यक्रमात पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल कोविड काळात ४ हजार कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा केला होता. पण कोविड काळातील ४ हजार कोटींचा खर्चाचा तपशील पालिकेकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या उत्तरातून समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त कार्यालयात अर्ज करत कोविड काळात करण्यात आलेल्या ४ हजार कोटींचा खर्चाबाबत सादर अहवालाची प्रत मागितली होती. आयुक्त कार्यालयाने गलगली यांचा अर्ज उप प्रमुख लेखापाल ( आरोग्य) यांसकडे हस्तांतरित केला. उप प्रमुख लेखापाल ( आरोग्य) लालचंद माने यांनी अहवालाची प्रत उपलब्ध नसल्याचे सांगत अर्ज उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांसकडे हस्तांतरित केला. प्रशासकीय अधिकारी चि. गे. आढारी यांनी अर्ज प्रमुख लेखापाल ( वित्त) यांसकडे हस्तांतरित केला. लेखा अधिकारी राजेंद्र काकडे यांनी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत अर्ज पुन्हा उप प्रमुख लेखापाल ( आरोग्य) यांसकडे हस्तांतरित केला.

एकीकडे कोविड काळात भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा आरोप होत असून केंद्रीय पथक आणि मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी करत आहे तर दुसरीकडे स्वतः पालिका आयुक्त ४ हजार कोटींचा हिशोब देत नाही, ही बाब गंभीर असल्याचे सांगत अनिल गलगली यांनी कोविड काळातील खर्चाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी केली.

Check Also

नायगाव दादर येथे २२ व २३ फेब्रुवारीला ग्रंथोत्सवाचे आयोजन दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व यांच्या संयुक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *