Breaking News

सुधाकर बडगुजर म्हणाले, व्हिडीओ मॉर्फ.., सुषमा अंधारे यांचा प्रत्यारोप, त्या पार्टीत भाजपा नेतेही…

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्क प्रमुख सुधाकर बडगुजर आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत पार्टी करतानाचे फोटोग्राफ सादर करत शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधण्याचा आरोप केला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत त्या फोटोग्राफ आणि व्हिडिओवर खुलासा केला.

यावेळी बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले, माझे आणि सलिम कुत्ता याच्याशी कोणत्याही प्रकारचे खाजगी संबध नाहीत. तो व्हिडिओ २०१६ सालचा आहे. मलाही पोलिसांनी एका प्रकरणात अटक करून नाशिक सेंट्रल तुरुंगात ठेवले होते. परंतु त्यावेळी सलिम कुत्ता याच्याबद्दलची माहिती झाली होती. परंतु त्याच्याशी माझे कोणतेही खासगी संबध नव्हते. त्यामुळे तो व्हिडिओ मॉर्फ केलेला असू शकतो असे सांगत नितेश राणे यांनी केलेल्या आरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

तसेच सुधाकर बडगुजर म्हणाले, सलिम कुत्ता प्रकरणी पोलिसांनी चौकशीला बोलावले तर आपण संपूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले.

दरम्यान, पुणे येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाल्या की, नितेश राणे यांनी जो व्हिडिओ प्रसारीत केला आणि त्यासंदर्भातील काही फोटो दाखविले. त्या व्हिडिओतील फोटो हे एकाच बाजूचे असल्याचे सांगत सलिम कुत्ता याच्या त्या पार्टीत तेव्हाचे भाजपाचे नेते तथा नाशिकचे पालकमंत्री गिरिष महाजन हे ही उपस्थित होते असा गौप्यस्फोट केला.

तसेच सुषमा अंधारे म्हणाल्या की, या दोन नेतेही उपस्थित असलेला त्या पार्टीतील व्हिडिओ दाखवित म्हणाल्याहा संपूर्ण व्हिडिओ पाहिले तर गिरिष महाजन स्पष्ट दिसत असल्याचेही सांगितले.

याशिवाय सुषमा अंधारे म्हणाल्या, यासंदर्भात काही प्रसारमाध्यमात वृत्त यापूर्वीच प्रकाशित झाले आहे. त्यावेळी या प्रकरणातून गिरिष महाजन यांचे नाव वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याचाही दावा केला.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका भटकती आत्मा…शरद पवार म्हणाले, ते खरंय

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच, बारामती आणि शिरूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *