Breaking News

नितेश राणे यांचा आरोप, बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी

मागील काही महिन्यांपासून राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात चांगलेच वाक् युध्द रंगलेले आहे. तसेच या दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडत आहेत. तसेच विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर आणि दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता यांचे संबध असल्याचा आरोप करत सलीम कुत्ता यांच्याबरोबर सुधाकर बडगुजर यांच्यासोबतचे पार्टी करतानाचे काही फोटो विधानसभेत दाखवित शिवसेना ठाकरे गटावर आरोप केला.

तसेच नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, सलिम कुत्ता हा दाऊदचा हस्तक असून मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. तसेच या आरोपींनी फक्त मुंबई शहरातच नाही तर शिवसेना भवनाजवळही बॉम्बस्फोट घडवून आणले. तसेच तो पॅरोलवर असताना अशा व्यक्तीसोबत शिवसेना ठाकरे गटाचा नेता सलिम कुत्ताच्या पार्टीत सहभागी होत डान्सही करतो यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे दाऊदच्या हस्तकांशी खाजगी संबध होत असल्याचे स्पष्ट होत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत म्हणाले, खरं सांगायच तर सलिम कुत्ता हा दाऊद इब्राहीमचा हस्तक आहे. तसेच तो पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्याला सार्वजनिकरित्या कोणत्याही कार्यक्रमात हजर राहता येत नाही. त्याचबरोबर पार्टीलाही हजर राहता येत नाही. त्यामुळे त्या फोटोत दिसणाऱ्या प्रत्येकाची एसआयटी मार्फत कसून चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासनही विधानसभेला दिले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *