Breaking News

सोनिया गांधी, राहुल गांधीनाही ईडीची नोटीस; काँग्रेस म्हणते झुकेंगे ना डरेंगें नॅशनल हेराल्ड प्रकरणी नोटीस ८ जूनला चौकशीला बोलावले

बिगर भाजपा सरकारमधील अनेक मंत्री, आमदार आणि राजकिय नेत्यांना सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून नोटीस आणि धाडी टाकण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. आता एका प्रकरणात ईडीने थेट काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून ८ जून रोजी चौकशीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

वाचा

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याबाबत बोलताना काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आम्ही झुकून सामना करणार नाही. सिंघवी म्हणाले की, सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील.

गांधी परिवाराविरोधात ईडीने समन्स बजावल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांनी याबाबत भाष्य केले आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कटाचा एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. पण आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही… छाती ठोकून लढणार असल्याचे स्पष्ट केले.

त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आरोप केला आहे की, यापूर्वी ईडीने हे प्रकरण बंद केले होते. भाजपा राजकीय विरोधकांना धमकवण्यासाठी बाहुल्या असलेल्या सरकारी तपास यंत्रणांचा वापर करत आहेत. यापूर्वी १२ एप्रिल रोजी काँग्रेस नेते पवन बन्सल यांची नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. त्याच्याकडून आर्थिक व्यवहारांसह अनेक बाबींवर चौकशी करण्यात आली.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी २,००० कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास ईडीने २०१४ मध्ये सुरू केला होता. यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसून ती चॅरीटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असे या प्रकरणावर काँग्रेसचे म्हणणे आहे.

यापूर्वीही सोनिया गांधी यांना ईडीकडून चौकशी करण्यासाठी नोटीस पाठविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहिर रोष प्रकट केला होता. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना या प्रकरणात नोटीस बजाविण्यात आली नव्हता. तसेच या दोन नेत्यांऐवजी इतरांना नोटीस बजावून त्यांची चौकशी करण्यात आली होती.

हे ही वाचा

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *