Breaking News

काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले, अयोध्या द ट्रॅप चित्रपटाचा रचेता दुसरं-तिसरं कोणी… मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या आरोपावर सचिन सावंतकडून दावा

उत्तर प्रदेशातून वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा तुर्तास स्थगित केल्याचे जाहिर करत याप्रश्नी सविस्तर बोलण्यासाठी पुण्यात आज जाहिर सभा घेतली. त्यावेळी अयोध्येत माझ्या विरोधात ट्रॅप लावण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या द ट्रॅप या चित्रपटाचा रचिता दुसरं-तिसरं कोणी नसून भाजपाच असल्याचे मत त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करत व्यक्त केले.

राज ठाकरे यांनी आजच्या भाषणात ‘अयोध्या द ट्रॅप’ या चित्रपटाची गंभीर कहाणी सांगितली आहे. या कहाणीचा रचेता भाजपा आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलं आहे. जर अयोध्येला गेलो असतो, तर कार्यकत्यांना जेलमध्ये सडवलं असतं. उत्तर प्रदेशमध्ये महाविकास आघाडी सरकार नसून योगी आदित्यनाथ यांचे भाजपाचे सरकार आहे. तिथे भाजपाचाच खासदार विरोध करत आहे. तेव्हा तिथे रसद पुरवण्याचा प्रयत्न कोणी केला असेल, तर तो भाजपाचाच असू शकतो असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

जे आम्ही काही दिवसांपूर्वी सांगितलं आहे ते सत्य आहे हे राज ठाकरे यांनी मान्य केलं आहे. मनसेची कुचंबणा करण्याचं काम भाजपाने केले. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी मनसेची जाणीवपूर्वक नामुष्की करण्यात आली आहे. भाजपा कोणते कुटील कारस्थान रचू शकतो हे या ‘अयोध्या द ट्रॅप’ चित्रपटाच्या कहाणीमुधून निश्चितच समोर आलं असेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. मी सांगितले ते सत्य ठरले. अयोध्येत गेलो असतो, तर केसेस टाकल्या असत्या. कोणी? योगी सरकारने तिथे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नाही. हा भाजपाचाच ट्रॅप आहे हे राज ठाकरे यांचेही मत आहे. भाजपा खासदारानेच विरोध केल्याने अयोध्या दौऱ्याविरोधात रसद महाराष्ट्रातून हा आरोप थेट फडणवीसांवर आहे. मात्र, मोदींकडे मागणी हा केमिकल लोच्या आहेच अशी उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी राज ठाकरेंवर केली. राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार आहे. सुरुवातीला हवा भरण्याचे काम भाजपानेच केले, पण हिंदूत्व व्होट बँकेत वाटेकरी नको असल्यानेच औरंगाबाद सभेआधीच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने काढता पाय घेतला. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जाणिवपूर्वक मनसेची कुचंबणा केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *