Breaking News

आपच्या दुसऱ्या मंत्र्याला ईडीकडून अटक पंजाबनंतर दिल्लीतील आरोग्य मंत्री जैन अटक केली

काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पहिल्यादाच सत्तेत आलेल्या एका मंत्र्याला लाच घेताना अटक केल्याचे उदाहरण ताजे असतानाच आज ई़डीने केलेल्या कारवाईत आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक केली.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीसोबत हवाला व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.यापूर्वीदेखील एप्रिल महिन्यात ईडीने सत्येंद्र जैन यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्याशी संबंधित काही कंपन्यांची ४.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीच्या या कारवाईनंतर भाजपाने आम आदमी पार्टीला लक्ष्य केलं होते. तसेच दिल्लीमधील आपचे सरकार बरखास्त करण्याची मागणी घेऊन भाजपाने दिल्लीमधील जंतर-मंतरवर आंदोलन केले होते.

तर दुसरीकडे आप पक्षाने याआधी सत्येंद्र जैन निर्दोष असल्याचा दावा केला होता. सत्येंद्र जैन हे एक प्रामाणिक व्यक्ती आहेत. न्यायालय त्यांच्यावरचा खटला रद्द करेल असा विश्वास आपने व्यक्त केला होता. तसेच पंजाबमधील विधानभा निवडणुकीच्या अगोदर सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक केले जाणार असल्याची मला माहिती मिळाली आहे, असे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केले होते. त्यानंतर आता ईडीने जैन यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

जैन यांना अटक केल्यामुळे केंद्रातील भाजपा सरकारकडून भाजपेतर सरकारांना लक्ष्य करण्यात येत असलेल्या संशयावर शिक्कामोर्तब होत आहे. यापूर्वी भाजपाची सत्ता नसलेल्या पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री आणि आमदारावर अशाच पध्दतीच्या कारवाया सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्रातही अशाच कारवाया सुरु करण्यात आल्या. महाराष्ट्रातील तर दोन मंत्र्यांना ईडीने अटक केली आहे.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *