Breaking News

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, हनुमानाच्या जन्मवादापेक्षा… केंद्राच्या नोटबंदी धोरणात मोठी चूक - दिलीप वळसे पाटील

नुकतेच रिझर्व्ह बँकेने आपला अहवाल जाहिर केला आहे. या अहवालानुसार देशातंर्गत चलनात असलेल्या २ हजार रूपयांच्या खऱ्या नोटा गायब होवून बनावट नोटा चलनात आल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि केंद्र सरकारला यावरून निशाणा साधत नोटबंदीने काय साधले असा सवाल केला.

वाचा

तर दुसऱ्याबाजूला राम भक्त हनुमानाचा जन्म कोठे झाला यावरून नाशिकमध्ये होत असलेल्या शास्त्रात सभा होत आहे. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी साधू संतांवर निशाणा साधत हनुमानाचा जन्मवाद अनावश्यक असून त्यापेक्षा महागाई, बेरोजगारीकडे लक्ष द्या असे आवाहन केले.

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या धोरणामध्ये मोठी चूक झाली असून हे कशामुळे घडले व धोरण कुठे फसले हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
आज राष्ट्रवादी जनता दरबार उपक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहिले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

नोटाबंदीचे धोरण भारतीय अर्थव्यवस्थेला अडचण निर्माण करणारे आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा हा पराभव आहे. हे कशामुळे घडलं व पुढे नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने काय उपाययोजना केली हे केंद्र सरकारने संपूर्ण चौकशी करून जनतेला माहिती द्यावी असेही ते म्हणाले

हनुमानाचा जन्म अंजनेरीला झाला की किश्ष्दिंला झाला… हा वाद अनावश्यक आहे याला फार महत्व देऊ नका असे सांगत त्यापेक्षा महागाई… बेरोजगारी… टंचाई… यासारखे अनेक प्रश्न देशासमोर आहेत याकडे लक्ष द्या अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

आज सगळे ठरवून चालले आहे. जे विषय देशासमोर नाहीत ते विषय काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राम जन्म आणि हनुमान जन्म कुठे झाला हा विषय आजचे नसल्याचेही ते म्हणाले.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांना आलेल्या धमकीची माहिती गृहविभागाकडे आली आहे. याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांना कडक शिक्षा केली जाईल. संबंधितांना पुरेशी सुरक्षा दिलेली आहे, वाटल्यास अजून सुरक्षेत वाढ केली जाईल असेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *