Breaking News

मोदींसारख खोट बोलून प्रगती करतो असे सांगायचे नाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची टीका

नागपूर : प्रतिनिधी

महिना १२ हजार रुपये प्रति महिना उत्पन्नापेक्षा एकही व्यक्ती देशात नको हे आम्ही ठरवले आहे. देशात कोणत्याही वर्गाचे उत्पन्न महिन्याला १२ हजारांपेक्षा कमी नको. भारताच्या २० टक्के सर्वात गरीब वर्गाच्या बँक खात्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर पैसे जमा होतील याचं आश्वासन मी तुम्हाला दिले आहे. १५ लाख जमा करण्याचं खोटं आश्वासन मी देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलतात, त्यांच वय जरा वाढलंय. त्यामुळे त्यांना त्याची आवश्यकता वाटत असल्याची खोचक टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी करत माझं तसं नाही, मला तुमच्यासोबत १५ ते २० वर्षे काम करायचे आहे. आम्हाला खोटं बोलून प्रगती करतो असे सांगायचेसल्याची उपरोधिक टोलाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

काँग्रेस काम करतं, भाजपाला फक्त आश्वासनं देता येतात असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसमधल्या काही अर्थतज्ज्ञांशी मी सल्लामसलत केली, त्यांना सांगितले की देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का न लावता गरीबांच्या खात्यात किती पैसे टाकता येतील असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यासाठी वेळ घ्या, अभ्यास करा असेही मी सांगितले ज्यानंतर माझ्याकडे आकडा आला तो ७२ हजारांचा. पी. चिदंबरम यांनी ७२ हजारांचा आकडा दिला. त्यामुळेच मी ते आश्वासन दिले असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गरीबीवर सर्जिकल स्ट्राईक करणं हेच आमचं लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भाजपाचे नेते म्हणतात हे पैसे कुठून येणार? तुम्ही अनिल अंबानींना जमीन दिली. तेव्हा हा प्रश्न का विचारला नाही? अनिल अंबानींना राफेलमध्ये सहभागी करून घेतलं. तेव्हा हा प्रश्न का आला नाही? पतंजलीला जागा दिल्या तेव्हा प्रश्न का विचारला गेला नाही? असे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. नोटबंदी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांच्या खिशातला पैसा काढून व्यापाऱ्यांना वाटला. देशात ज्यांनी चोरी केली त्यांच्या खिशातून पैसे येतील. मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्या खिशातून पैसे काढून तुम्हाला देऊ. हे सरकार कर्जमाफीचा डंका वाजवतं, मात्र ते शक्य झालं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावामुळे. मात्र कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यात आले का? नाही आले. यावरूनच लक्षात घ्या हे सरकार खोटं बोलणारं सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान या ठिकाणी आम्ही दोन दिवसात कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले तिथे जर हे शक्य आहे तर महाराष्ट्रात का नाही? सा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *