Breaking News

नोटबंदीत १५ लाख जमा करणाऱ्यांच्या अडचणी वाढणार सीबीडीटीने २ लाख लोकांना पाठवली नोटीस

नई दिल्ली: प्रतिनिधी
नोटबंदीच्या काळात बँक खात्यात १५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्यांसाठी आता वाईट बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर बँक खात्यात १५ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्या २ लाख लोकांना नोटीस पाठवली आहे. सीबीडीटीचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी यासंबधी माहिती दिली आहे.
चंद्रा यांनी म्हटले की, काही लोकांकडून १५ लाखापेक्षा अधिक रक्कम खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी रिटर्नही फाईल केलेले नाहीत अशा १.९८ लाख खातेदारांची आम्ही ओळख पटवलेली आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात या खातेदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, अद्याप कुणीही या नोटीसीला उत्तर दिलेले नाही. नोटीसीला उत्तर न देणाऱ्यांवर सीबीडीटीकडून दंड आणि खटला दाखल करण्याची कारवाई करणार आहे.
दरम्यान, कर चोरी, उशीरा कर भरणे, उत्पन्न लपवणे आदी ३ हजार प्रकरणे तीन महिन्यात नोंदवली गेली असल्याची माहिती चंद्रा यांनी दिली.

Check Also

एचडीएफसी म्युच्युअल फंडाबाबत मोठी घोषणा २६ एप्रिलपासून मॅन्युफॅक्चरींग फंड बाजारात

एचडीएफसी HDFC म्युच्युअल फंडाने २२ एप्रिल रोजी HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड लॉन्च करण्याची घोषणा केली. ओपन-एंडेड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *