Breaking News

शेअर बाजारात १० वर्षातील सर्वात मोठी घसरण सेन्सेक्समधील ७ वी मोठी घसरण

मुंबई : नवनाथ भोसले

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देशातील शेअर बाजार विक्रमी कोसळले. सेन्सेक्स तब्बल सेन्सेक्स तब्बल ८४० अंकांनी कोसळला. तर निफ्टीतही २५६ अंकांची मोठी घसरण नोंदवली. अडीच वर्षातील सेन्सेक्स, निफ्टीचा तर मागील १० वर्षातील ही सर्वात मोठी घसरण असल्याचे आर्थिक जगतात मानले जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर्सच्या नफ्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर आकारल्यामुळे शेअर बाजार कोसळले. यामध्ये गुंतवणूकदारांना ४.५ लाख कोटींचा फटका बसला. मागील दहा वर्षातील सेन्सेक्समधील ही सातवी मोठी घसरण आहे. एका दिवसातील सर्वात मोठी घसरण २४ ऑगस्ट २०१५ ला झाली होती. या दिवशी सेन्सेक्स १ हजार ६२४.५१ अंकाने कोसळला होता.

दिनांक                         सेन्सेक्समधील घसरण
२ जानेवारी २०१८                   ८३९.९१ अंक
११ फेब्रुवारी २००८                   ८३३.९८
 ३ मार्च २००८                      ९००.८४
१७ मार्च २००८                      ९५१.०३
१० ऑक्टोबर २००८                  ८००.५१
 २४ ऑक्टोबर २००८                 १०७०.६३
 २४ ऑगस्ट २०१५                  १६२४.५१
 ६ जुलै २००९                      ८६९.६५
 ६ फेब्रुवारी २०१५                   ८५४.८६
 ११ फेब्रुवारी २०१६                  ८०७.०७ 

Check Also

एसआयपी माध्यमातून गुंतवणूकीचा विचार करताय? हे ७ प्रकार माहित आहेत का आर्थिक गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा

देशातील गुंतवणूकदारांकडून एसआयपी SIP अर्थात सिस्टीमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन गुंतवणूकीच्या पर्यायाचा वापर केला जात आहे. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *