Breaking News

वाहतूक सेनेच्या दणक्याने कुर्ला येथील फिनिक्स मॉल प्रशासन ताळ्यावर ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, अपंगाकरिता मोफत पार्किंग, व्हीलचेअर सुविधा सुरु

मुंबईः प्रतिनिधी

मुंबईतील नामांकित कुर्ला येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहक नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा नसल्याच्या अनेक तक्रारी गेले अनेक दिवसांपासून होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते हाजी अरफात शेख यांनी फिनिक्स मॉल प्रशासनाला उग्र आंदोलनाचा इशारा दिल्याने मॉल प्रशासनाने जेष्ठ नागरीक, गर्भवती महिला, अपंगाकरीता मोफत वॅलेट पार्किंग आणि व्हीलचेअरची सुविधा सुरू केली.

शिवसेना स्टाईल आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मॉल प्रशासनाने तातडीने यासंबंधी पाऊले उचलली असून हाजी अरफात यांनी केलेल्या मागण्या पूर्ण केल्या. मॉल परिसरात तैनात केलेले सुरक्षारक्षक जे  नागरिकांशी (विशेषत: महिलांशी) उद्धटपणे वर्तन करायचे त्या सुरक्षारक्षकांची तातडीने बदली करून नवीन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. तसेच जेष्ठ-वयोवृध्द नागरिक, गर्भवती महिला, अपंग व्यक्ती यांच्याकरिता मोफत वॅलेट पार्किंग, वाहन पार्किंगकरिता राखीव जागा आणि प्रवेशद्वारावर मोफत व्हील चेअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच मॉलमध्ये असणाऱ्या फूडकोर्ट मध्ये नागरिकांना बसण्याकरिता नसलेली आसनव्यवस्था देखील पूर्ववत करण्यात आली असून सदर सर्व मागण्या मान्य पूर्ण करून दिल्याबद्दल मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! निजामने केली पुनमची निघृण हत्या

मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *