Breaking News

ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार राज्य सरकारकडून पुरस्कार जाहीर

मुंबई: प्रतिनिधी

मागील पाच दशंकाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून रसिकांची सेवा करणारे, चित्रपटांसोबतच माहितीपट, लघुपट आणि मालिकांचेही यशस्वी दिग्दर्शन-निर्मिती करणारे सर्जनशील ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाला. मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि १० लाख रुपये असे स्वरूप असलेला हा पुरस्कार बेनेगल यांना मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१८ च्या सांगता समारंभामध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

प्रामाणिकपणे सिनेसृष्टीची सेवा करणाऱ्या बेनेगलांनी कधीच पुरस्कारांचा हव्यास धरला नाही. त्यामुळे पुरस्कारांनीही अविरतपणे काम करणाऱ्या बेनेगल यांची पाठ कधी सोडली नाही. १९७४ मध्ये ‘अंकुर’चित्रपटापासून सुरू झालेला बेनेगलांचा प्रवास २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेल डन अब्बा’पर्यंत पोहोचला आहे. या दरम्यानच्या काळातील बेनेगलांच्या सर्वच चित्रपटांनी पुरस्कारांना गवसणी घातली आहे. या पुरस्कारांच्या यादीत राष्ट्रीय पुरस्कारांची संख्याच जास्त आहे. सिनेमा तसेच माहितीपटांसाठी नऊ वेळा राष्ट्रीय पुरस्कारास पात्र ठरलेल्या बेनेगलांना २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. आता चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराच्या रूपात त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. किरण शांताराम, राहुल रावल, प्रसून जोशी, भारती प्रधान आणि विनोद अनुपम यांच्या स्वतंत्र समितीने बेनेगल यांची व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *