Breaking News

जान्हवी च्या पोस्टवर शिखर पहाडियाची सूचक कमेंट

जान्हवी कपूर पुन्हा एकदा आपला बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्यामुळे चर्चेत आली आहे. जान्हवी गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअपही झालं होतं. पण, आता ते पुन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. जान्हवी आणि शिखर यांना अनेकदा एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं.

यादरम्यान शिखर पहाडियाने केलेल्या कमेंटमुळे त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना पुन्हा एकदा जोर मिळाला आहे. ऑरीने एका पार्टीतला व्हि़डीओ शेअर केला होता. ज्यावर कमेंट जान्हवीला टॅग करत शिखरने लिहिले होते, मी फक्त तुझा आहे. मात्र नंतर त्याने हि कमेंट डिलीट केली. जान्हवी आणि शिखर अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. जान्हवीची बहीण खुशी कपूरच्या बर्थडे पार्टीत दोघेही एकत्र दिसले होते.

ऑरीने एका आठवड्यापूर्वी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर पार्टीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या पार्टीत सुहाना खान, खुशी कपूर, सारा अली खान, राशा थडानी, अलाया एफ आणि निर्वाण खान यांसारख्या स्टार किड्सनी हजेरी लावली. या पार्टीत शिखर पहाडिया आणि त्याचा भाऊ वीर पहाडिया देखील उपस्थित होते. मात्र, जान्हवी या पार्टीत सहभागी झाली नव्हती.

या व्हिडिओमध्ये शिखर एका मुलीसोबत पोझ देत होता. कमेंट बॉक्समध्ये जान्हवीने शिखरला टॅग करून विचारले की गुलाबी ड्रेसमधील मुलगी कोण आहे? या कमेंटनंतर शिखरने तिला टॅग केलं आणि म्हटलं – मी फक्त तुझाच आहे असे त्याने प्रतिउत्तर दिले मात्र काही वेळातच त्याने ही पोस्ट डिलीट केली मात्र दुसरीकडे या दोंघांच्या नेत्यावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

शिल्पाचा पती अखेर अडीज वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिसला विना मास्क राज कुंद्राने स्वत:च्याच आयुष्यावर बनवला सिनेमा म्हणाला की,

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा पॉर्न चित्रपटाच्या प्रकरणावरून चांगलाच चर्चेत आला होता. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *