Breaking News

सणासुदीच्या हंगामात वाहन कंपन्यांचा सवलतींचा वर्षाव गेल्या वर्षीपेक्षा ५० टक्के अधिक सूट

देशात सणांचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. सणामध्ये वाहन, दागिने आणि इतर वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते. यामुळे वाहन कंपन्या त्यांची विक्री वाढवण्यासाठी अनेक सणासुदीच्या ऑफर्स देत आहेत. कार कंपन्या देत असलेल्या ऑफर्समध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलत यांसारख्या ऑफरचा समावेश आहे. कार कंपन्यांना या सणाच्या हंगामात संपूर्ण वर्षाच्या विक्रीपैकी २५ टक्के विक्रीची अपेक्षा आहे.

कार कंपन्यांनी प्रथमच १० लाखांहून अधिक वाहनांची विक्री करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या सणासुदीच्या हंगामात कंपन्यांनी ९.४ लाख वाहनांची विक्री केली होती. साधारणपणे या सणाच्या हंगामात उच्च श्रेणीतील वाहनांवर आणि कमी विक्री होणाऱ्या मॉडेल्सवर जास्त सवलत उपलब्ध आहे. लोकप्रिय मॉडेल्सना कमी सूट मिळते.

कार कंपन्या विविध मॉडेल्सवर २५,००० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत सूट देत आहेत. ही सवलत २०२२ च्या सणासुदीच्या हंगामापेक्षा जास्त आहे. कार मॉडेल आणि डीलरशिप स्थानावर अवलंबून. सवलतींमध्ये २०२२ ते २०२३ पर्यंत सरासरी वाढ ४०-५० टक्के आहे. काही मॉडेल्सवरील सूट ७५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे दुचाकी कंपन्याही सवलत देत आहेत.

या सणासुदीच्या मारुती सुझुकी डिझायरवर ४०,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तर होंडा अमेझ कारवर ग्राहकांना ७०,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ह्युंदाई वेरनावर सणासुदीच्या काळात ३०,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
होंडा सिटी ही होंडाच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी ही एक आहे. या कारवर ९०,००० रुपयांपर्यंतची भरघोस मिळत आहे. स्कोडा स्लाव्हिया या आलिशान सेडान कारवर ७५,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तर फोक्सवॅगन विर्टस या कारवर ग्राहकांना ८०,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Check Also

इलेक्ट्रिक वाहन धोरणाबाबत लवकरच मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारकडून सुतोवाच

येत्या काही दिवसांत सरकार नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणावर मार्गदर्शक तत्त्वे घेऊन येण्याची शक्यता आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *