Breaking News

अभिनेत्री जयप्रदा विरोधात निघाले अटक वॉरंट

प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांच्याविषयीची एक मोठी बातमी आता समोर आली आहे. कोर्टानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढला आहे. यामुळे जयाप्रदा यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. या वृत्तामुळे चित्रपट सृष्टीत तसेच देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूकीच्या वेळेस माजी खासदार जयाप्रदा यांच्याविरोधात आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली होती. त्याचे सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रकारचे पडसाद उमटले होते. या प्रकरणावर जयाप्रदा यांना कोर्टात जावून त्यांचा जवाब द्यायचा आहे. त्याप्रकरणी त्यांना समन्सही पाठविण्यात आले असून त्या कोर्टात गेल्या नसल्याची माहिती पुढे आली आहे.

कोर्टानं समन्स धाडूनही अभिनेत्री जयाप्रदा कोर्टात न गेल्यानं आता कोर्टानं कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. म्हणून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी होणा आहे. २०१९ मध्ये जयाप्रदा यांच्यावर स्वार पोलीस ठाण्यामध्ये आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

 

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

शिल्पाचा पती अखेर अडीज वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिसला विना मास्क राज कुंद्राने स्वत:च्याच आयुष्यावर बनवला सिनेमा म्हणाला की,

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा पॉर्न चित्रपटाच्या प्रकरणावरून चांगलाच चर्चेत आला होता. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *